प्रकरण सातवें. ९५ निराशेनें एक दीर्घ श्वास सोडून लक्ष्मी म्हणाली, " ती काय त्यांच्या वर प्रेम करते ? " “ तें मी काय सांगूं ? मला जें समजलें तें मीं तुला सांगितलें. तुझें घर तुला सांभाळावयाचें असल्यास सांभाळ ! " 66 पण ते वामनराव तर सुधारक आहेत ? ते कांहीं मालतीचा त्यांच्या- बरोबर विवाह होऊ देणार नाहींत. " “ वेडे, विवाहावांचून दोघांत प्रेमभाव कांहीं वाढणार नाहीं ना ? लक्ष्मी, तूं खरोखरच फार भोळी आहेस, ते वामनराव पके सुधारक आहेत हें मला समजले आहे. एक बायको असतां दुसरी करण्यास या सुधारकांनी पूर्ण प्रतिबंध घातला आहे, पण त्याबरोबरच स्त्रीपुरुषांना एकमेकांत मिस- ळण्यास त्यांनी पूर्ण मोकळीक ठेवली आहे. यामुळे केव्हां केव्हां फार विलक्षण प्रकार होतात. " हैं ऐकून क्षणभर लक्ष्मी स्तब्ध बसली होती. नंतर डोळ्यांत पाणी आणून म्हणाली, “ उमाताई, तुम्ही म्हणतां तें सगळें खरें; पण त्यांना मी आपल्या मुठींत ठेवीन असे माझ्या आंगीं तरी कोणते गुण आहेत ? जे नशिवांत असेल, तें होईल ! लक्ष्मीचे हे शब्द ऐकून उमाच्याहि डोळ्यांतून दोन अश्रू गळाले. तिनें लक्ष्मीला आपल्या हृदयाशीं कुरवाळून धरून तिचे डोळे पुसले आणि ती मनोमय परमेश्वराची करुणा भाकून म्हणाली, " देवा, या सोन्याच्या पुतळीची माती न होवो, म्हणजे झालें ! ” दिनकरला पत्र यानंतर लवकरच परिक्षेचे निकाल प्रसिद्ध झाले व त्यांत दिनकर, दिवाकर व दिनकरचे तिघे स्नेही पास झाल्याचे समजलें या बातमीनें अर्थातच सगळ्यांना आनंद झाला. या वेळींहि मालतीनें पाठवून गोड गोड शब्दांनीं तिने त्याचें अभिनंदन केलें. दिनकरनेंहि पत्रोत्तर पाठवून कृतज्ञता प्रगट केली. हळू हळू हे सुटीचे दिवस संपत आल्यावर पुढील योजनेसाठीं दिनकरनें मुंबईस जाण्याची पुन्हां तयारी केली. दिवाकरहि त्याच्याच बरोबर मुंबईस जाणार होता. दुसऱ्या दिवशीं दिनकर आतां मुंबईला जाणार असें जेव्हां नक्की ठरलें, तेव्हां आज सांगेन
पान:सुखाचा शोध.pdf/९५
Appearance