पान:सुखाचा शोध.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९४ सुखाचा शोध. “ छे:! तूं अगदींच भोळी आहेस. त्यांना कोणाची पत्रे येतात, ते मला माहीत आहे. एक पत्र मीं पाहिले देखील होतें." 66 लक्ष्मी केविलवाण्या स्वरानें ह्मणाली. उमाताई, मला सांगान कोणाची पत्रे येतात तें." " तें तुला मी मग सांगेन. त्या आधीं तूं एक काम कर. आजरात्रीं भावोजींना ह्मणावें, तुम्ही मुंबईला ज्या मुलांना शिकवायला जातां, त्यांना शिकवावयाला जात जाऊं नका. 25 " पण ते माझें कसें ऐकतील ? ते ह्मणतील तेथे पंधरा रुपये शिक- वणीचे मिळतात, तें नुकसान मी कां करून घेऊं ? " ८८ 16 तू त्यांना सांग कीं, त्या रुपयांची तजवीज घरांतून होईल ह्मणून. लक्ष्मी क्षणभर स्तब्ध राहिली. नंतर खिन्नतेने म्हणाली, तुम्ही हे सगळं मला उलगडून सांगाल तर माझ्यावर फार उपकार होतील. तेथें त्यांनी शिकवायला जाऊं नये, असे तुम्हाला कां वाटतें ? " उमाताई,. उमाहि क्षणभर स्तब्ध राहून उद्विग्नतेनें म्हणाली, " लक्ष्मी, मोठेंस काळजी करण्यासारखें नाहीं; पण दिनुभावोजींना आतांच सावध केलेले बरें. तुझ्या सौंदर्याप्रमाणे तुझा स्वभावहि सुंदर असल्यामुळे अर्थातच जगाची पारख करण्यास तो समर्थ नाहीं आणि म्हणूनच तुला दिनुभावो- जींच्या स्वभावाचें निरीक्षण करतां येत नाहीं, अंतःकरणांतल्या पूज्य भावने- मुळे त्यांचें प्रत्येक करणें तुला चांगलेच दिसतें. ते मुंबईला ज्या वामन- रावांच्या घरीं मुलांना शिकवायला जातात, त्यांना सोळा सतरा वर्षांची मालती या नांवाची अविवाहित मुलगी आहे. या मुलीलाहि दिनुभावोजी शिकवीत असतात. तिलाच दिनुभावोजी वारंवार पत्र पाठवीत असतात आणि तीहि त्यांना पत्रावर पत्र पाठवीत असते." लक्ष्मी उदासीनतेनें म्हणाली, " पाठवीना बिचारी. त्याच्याशी मला काय करावयाचें आहे ? " उमा किंचित् रागाने म्हणाली, "त्याच्याशी तुला काय करावयाचें आहे ? लक्ष्मी, तुला वेड तर नाहीं लागलें ? ती तरुण, भावोजीहि तरुण; तेव्हां त्या दोघांच्या पत्रव्यवहाराचा तुला कांहींच अर्थ समजत नाहीं ना ? "