सुखाचा शोध. उद्यां सांगेन अशा विचारानें सांगण्यास कचरणाऱ्या लक्ष्मीनें मोठें धैर्य केले आणि दिनकर रात्रीं खोलीत आल्यावर मोठ्या कष्टानें तिनें त्या नांव- डत्या विषयासंबंधानें बोलण्यास आरंभ केला. ती म्हणाली, "तुम्ही मुंबईहून परत केव्हां येणार ? ” लवकरच येईन असे म्हणतों. दिवाकराच्या पुढील 'कोर्स' ची व्यवस्था करावयाची आहे. तसेंच मी पुढे काय करावयाचें हेंहि ठरवा- वयाचें आहे. पुढें शिकावयाचें ठरल्यास मी तेथेंच राहीन; पण कांहीं नौकरीचा योगायोग आल्यास मग मात्र घरीं कांहीं दिवस राहून नंतर नौकरीवर जाईन. जर रामपुराला परत येण्याचे ठरलें, तर तुझ्यासाठीं काय आणूं ? 29 लक्ष्मी म्हणाली, “ मला कांहींहि आणूं नका. तुम्ही इकडे येऊन कांहीं दिवस रहावें, एवढीच माझी इच्छा आहे; पण जर मुंबईस रहा- वयाचें ठरलें तर — १, लक्ष्मी इतकेंच म्हणून थांबली. पुढे तिची जीभच हलेना. लक्ष्मीला बोलतांना मध्येच थांबलेली पाहून दिनकर हंसत हंसत म्हणाला, " मुंब- ईला रहावयाचें ठरलें तर काय ? " " तुम्हांला कांहीं मी सांगणार आहे; पण तुम्ही माझें म्हणणें ऐकाल का ? ११ 66 हो अवश्य. पण ऐकण्यासारखें असल्यास. तूं भलतेंच कांहीं सांगि- तल्यास मी कसें ऐकूं ? " “ मी भलतेंच कशाला सांगू; पण मीं चांगलें सांगितलें, तर तें तुम्ही ऐकाल ना ? " पुन्हां पुन्हां लक्ष्मीचा तोच प्रश्न ऐकून दिनकरला साहजिक आश्चर्य वाटलें. तो म्हणाला, तुझें काय म्हणणे आहे, तें तर मला अगोदर सांग; मग ऐकावयाचें कीं न ऐकावयाचें तें मागाहून ठरवितां येईल. " लक्ष्मी लाजत लाजत म्हणाली, " तुम्ही मुंबईला ज्या गृहस्थांकडे मुलांना शिकवायला जात असतां, त्या गृहस्थांकडे जात जाऊं नका. लक्ष्मीचे हे शब्द ऐकून दिनकर एकाद्या अपराध्याप्रमाणें लज्जित झाला. ""
पान:सुखाचा शोध.pdf/९६
Appearance