प्रकरण सातवें. मग दुसऱ्याचें मन मी कसें ताब्यांत ठेवणार ? ती काय कडीकुलुपांत ठेवण्यासारखी वस्तु आहे ? " " कुलुपांत ठेवण्यासारखी वस्तु नाहीं हें खरें; पण त्यावर पाहरा ठेवा- चयाला नको का ? नुसती डोळ्यांची नजर तरी ठेवायला हवी.” 66 “ ते आपले स्वतःचें मन संभाळावयाला असमर्थ आहेत, नाहीं ?” होय. असे मला तर वाटतें. तूच सांग ते तुझ्यावर पूर्वीसारखें प्रेम करतात ? " 66 लक्ष्मी लाजून ह्मणाली, "हे काय विचारतां ! मला तर वाटतें त्या. बाबतीत माझ्यासारखी नशीबवान् कोणीच नाहीं." “ छेः ! मला नाहीं तर्से वाटत. अलीकडे त्यांचें मन अस्वस्थ आहे, असे मला वाटते. पूर्वी भावोजी सुट्टींत घरीं आले हाणजे केव्हां रात्र होईल आणि तुझ्या खोलीत जाईन असे त्यांना होत असे; पण आतां माडीवर जाऊन रात्रीचे लिहीत काय बसतात, नी वाचीत काय बसतात, त्याकडे तुझें लक्ष आहे ?" " त्यांना लिहिण्या वाचण्याचा विशेष नाद आहे, तेव्हां त्या बाबतींत त्यांना कसा दोष देऊं ? माझें असावें तसे लिहिण्यावाचण्याकडे लक्ष नाहीं, ह्मणून त्यांना किती तरी वाईट वाटतें. केव्हां केव्हां ते रागावतात देखील.” 2 “ मी त्यांना काल झटलें, भावोजी, आतां रात्रीचे दहा वाजून गेले, जा जाऊन निजा, तर मला ह्मणाले, 'मला लवकर झोप येत नाहीं.' मीं झटलें, मग झोंप लागेपर्यंत गप्पा गोष्टी सांगत बसा.' तेव्हां ह्मणाले, " तुझी तुमच्या धाकट्या जाऊबाईला त्या विद्येत अगदीच मागे ठेवलें आहे.' त्यावरून मी ओळखले की तुझ्याशी ते कांहीं मोकळ्या मनानें चागत नाहींत. तूच सांग बरें, ते अलीकडे मोठ्या आतुरतेनें पोस्टांत कां जातात ? " " आलेले पत्र आणण्यासाठीं." 66 पण तें पत्र कोणाचें तें तुला माहीत आहे ? ” बहुतकरून त्यांच्या स्नेह्यांची पत्रे असावीत. लग्नाच्या वेळीं जे स्नेही आले होते, त्यांच्याविषयीं ते अनेक गोष्टी मला सांगतात. " 66
पान:सुखाचा शोध.pdf/९३
Appearance