सुखाचा शोध. आणि असें खोडाखोडीचें पत्र मालतीला पाठविणें त्याला प्रशस्त न वाटल्या- मुळे अर्थातच तीन चार पत्रे त्यानें लिहिली आणि वरील पत्र पसंत करून तेंच पाठविण्याचें त्यानें ठरविलें. पत्र पाकिटांत घालून बंद केल्यावर त्यानें जेव्हां घड्याळांत पाहिले, तेव्हां रात्रीचे दहा वाजले आहेत, असे त्याला दिसून आलें. तो तेथून तसाच उठला आणि निजण्यासाठीं खोलींत गेला. तो येण्याच्या पूर्वीच खोलींत लक्ष्मी येऊन निजली होती व तिला चांगली झोंपहि लागली होती. बाजूला एक लहानसा दिवाहि जळत होता. इतका वेळ दिनकरच्या हृदयदर्पणावर मालतीचीच मूर्ति प्रतिबिंबित झाली होती; पण खोलीत येऊन ती मंचकावर निजलेली रम्य आणि पवित्र मूर्ति जेव्हां त्यानें पाहिली, तेव्हां अर्थातच त्याचें हृदय लक्ष्मीमय होऊन गेले. आज त्याचें अंतःकरण उत्साहपूर्ण असल्यामुळे त्यानें लक्ष्मीला जागें केले आणि तिच्याबरोबर अनेक हितगुजाच्या गोष्टी सांगून ती रात्र त्याने मोठ्या आनंदांत घालविली. दिनकरच्या वर्तनांतला हा फरक लक्ष्मीच्या लक्षांत आला; पण त्याचे कारण मात्र तिला उमगलें नाहीं. गरीब विचारी निर्वाध बालिका ! तिला हें कोर्डे कसें उकलणार ? तिला काव्याची गोडी नव्हती. प्रतिभेची आणि तिची ओळख नव्हती. सावें वागणे आणि पवित्र आच रण एवढेच तिला माहीत होतें. पुढच्या सोमवारी भुसावळ येथील म्याजिस्ट्रेटच्या कचेरींत दिनकरचा खटला सुनावणीस निघावयाचा असल्यामुळे दिनकर अर्थातच त्या दिव- साची वाट पहात होता आणि त्याप्रमाणें तो भुसावळ येथे जाऊन दाखल झाला. धुळ्याचे वकील नारायणराव जोशी, हे त्याला स्टेशनावरच भेटले. दोघांनी परस्परांस नमस्कार केल्यावर नारायणराव म्हणाले, “ दिनकरराव, आपणास निष्कारण हेलपाटा पडला. आपल्या तिकिटकलेक्टर साहेबांनीं फिर्याद काढून घेतली आणि स्वतः तिकिटकलेक्टरहि कामावरून दूर झाले.” ५६ दिनकर हंसत हंसत आश्चर्याने म्हणाला, " असें कांहीं होईल, अशी मला कल्पना नव्हती. मी तर ऐकत होतों कीं, ही फिर्याद स्वतः रेल्वे- कंपनीच चालविणार. " " होय. तसा आग्रह स्टेशनमास्तरनें धरला होता; पण वर्तमानपत्रां-
पान:सुखाचा शोध.pdf/९०
Appearance