Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सातवें कडू असैहि मिळेल; पण तें भोगण्यास माझी तयारी आहे. तिकिट- कलेक्टराची कातडी गोरी असून त्याने माझ्यावर मारहाण केल्या- बद्दलची फिर्याद केली आहे. कदाचित् रेल्वेकंपनीच ही फिर्याद पुढें चालवील असा रंग आहे. तेव्हां ही अलीकडच्या युगांतली डोळस न्यायदेवता माझ्या काळ्या कातडीकडे तिरस्कारानेंहि पाहण्याचा संभव आहे; पण मी त्यासंबंधानें बेफिकिर आहे. आमच्या राष्ट्रांतला प्रत्येक तरुण जर ही भीति न बाळागतां कर्तव्यास सदैव जागृत राहील, तर आमच्या राष्ट्राचा अभ्युदय फारसा लांब आहे, असें कांहीं ह्मणतां यावयाचें नाहीं. शिक्षा भोगण्याचा प्रसंग आल्यास मी ती आनंदानें सोशीन. कारण निष्कारण भोगा- व्या लागलेल्या शिक्षेनें राष्ट्रांतल्या बाणेदार वृत्तीच्या तरुणांच्या हृदयावर जो आघात होतो, त्याचें फळ पुढें मांगें राष्ट्राला चांगले असेच मिळतें, असा इतिहासाचा नियम आहे. कसेंहि असो, आपण व आपल्या वडिलांनी मजबद्दल पत्रांत जी सहानुभूति व्यक्त केली आहे, त्याबद्दल मी आपला चिरकृतज्ञ आहे. माझ्या आतस्वकीयांनी मला या बाबतींत अगदाँ नाउमेद केलें होतें. पण आपल्या पत्रानें माझा उत्साह द्विगुणित झाला आहे. आणखी- हि कांहीं गृहस्थांनी मला मदत करण्याचे कबूल केले आहे. आप- ल्या वडिलांनी पैशाची मदत करण्याचें कबूल केलें आहे; परंतु तिची आवश्यकता नाहीं. जरूर पडल्यास मी या बाबतीत आप- णास अवश्य कळवीन. खटल्याचा निकाल होतांच आपणास पत्र लिहितों. आपणहि मधून मधून पत्र पाठवून सर्वांचें कुशल कळ- वीत असावें. मदन व वसंत यांना आशीर्वाद. रा. वामनराव यांना सा. न. प्र. करणें. कळावें. आपला दिनकर. हें वरील लहानसें पत्र तयार करण्यास दिनकरला बराच वेळ लागला. माल- तीला पत्र लिहावयाचें आहे, या एका कल्पनेनें तो फार काळजीपूर्वक व अलंका- रिक असे पत्र लिहीत होता. एकादें वाक्य आवडलें नाहीं, ह्मणजे तें खोडावे सु० शो०...६