पान:सुखाचा शोध.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सातवें. तल्या टीकेच्या भडिमारानें असिस्टंट ट्रॅफिक सुपरिटेंडेंट खडबडून जागे झाले आणि ते स्वतःच भुसावळला येऊन चवकशी करून गेले. चवकशी 'अंती त्यांना तिकिटकलेक्टरचेंच वर्तन निंद्य दिसून आलें, तेव्हां त्यांनी त्याला बडतर्फ करून फिर्याद काढून घेतली. यामुळे मींहि आपली फिर्याद काढून घेतली.” ही हकीकत ऐकून दिनकरला अर्थातच आनंद झाला. तो तसाच परतणार होता; पण नारायणरावांनी फार आग्रह केल्यामुळे तो गांवांत गेला व जेवण वगैरे करून नंतर रामपुरास परत गेला. दिनकरकडून ही हकीकत घरांत समजल्यावर सगळ्यांना आनंद झाला, हें निराळे सांगावयाला नको; पण त्याबरोबरच दिनकरची ओतप्रोत स्तुतीहि सुरू झाली. ' दिनकर अर्से केव्हांहि करणार नाहीं, असें मी पूर्वीच म्हणाले होतें ' ह्मणून यमूना ह्मणाली, ' ही सगळी कुलस्वामिनीची कृपा ' असें यशोदा झणाली. ' या खटल्याचें कांहीं होणार नाहीं, असें मी पूर्वीच 'ह्मणालो होतो. ' ह्मणून भास्करराव हाणाले. एकंदरीत सर्वच रंग पालटून विसूकाकांच्या घरावरची उदासीनता पार नाहीशी होऊन गेली आणि जो तो दिनकरला शाबासकी देऊं लागला. या एकंदर प्रकाराकडे दिनकरचें मुळींच लक्ष नव्हतें असें ह्मटले तरी चालेल. मालतीला ही हकीकत केव्हां कळवीन असे त्याला झाले होतें. थोडासा अवकाश मिळतांच या खट त्याची हकीकत त्यानें मालतीला कळविली. या पत्रांत खटल्याच्या हकी- कतीशिवाय थोडें काव्य नव्हते असे कांहीं नाहीं. चार सहा दिवसांनी या पत्राचें मालतीकडूनहि उत्तर आले. त्या पत्रांत शेवटीं तिनें लिहिले होते कीं, " एकंदरीनें या खटल्यांत आपणच यशस्वी झालां, असें ह्मणावयाला कांहीं हरकत नाहीं. आपण अशा यशस्वी स्थितीत आह्मां सर्वांना दर्शन द्यावे अशी माझी फार इच्छा आहे. परीक्षेचा निकाल कळल्यावर आपले येणें मुंबईला होईलच. आपल्या समक्ष भेटीनें आह्मां सर्वांना खरोखर फार आनंद होईल, " या पत्रानें दिनकरला साहजिक मोठे समाधान वाटले. दिनकरनेंहि या पत्रास असेंच काव्यमय उत्तर पाठविलें. "निरा- शेनें उद्विग्न झालेल्या हृदयावर आपल्या पत्रानें जो परिणाम झाला आहे, तो कळविण्यास योग्य असे शब्द मला आठवत नाहींत. रोग्यास अमृताने