पान:सुखाचा शोध.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सातवें. अश्रु ढाळते, हे त्याला पहावयाचें होतें. दिनकर अशा विचारांत असतां नऊ वाजल्यावर लक्ष्मीचें त्याच्या खोलीत आगमन झालें. ती रम्य आणि हंसत- मुख मूर्ति समोर पाहतांच इतका वेळ दिनकरच्या अंतःकरणावर खेळणारी मालतीची मूर्ति नाहींशी झाली आणि त्या हृदयसिंहासनावर लक्ष्मीची प्रतिमा अधिष्ठित झाली. एकमेकांनी एकमेकांस चार दोन प्रश्न केल्या वर दिनकर हाणाला, 66 तुझ्या गळ्यांत मोहनमाळ दिसत नाहीं ती ? " "मी काढून ठेवली. 23 " कां ? " 66 थोरल्या जाऊबाईना माहेनमाळ नाहीं हाणून. "" " म्हणजे ? उमाला माहेनमाळ नाहीं, ह्मणून तूं ती काढून ठेवायची हा न्याय कोठला ? " " दोघींना सारखेच दागिने आहेत, असें लोकांनीं ह्मणावें ह्मणून मी ती घालीत नाहीं. शिवाय जाऊबाईनाहि त्यामुळे मत्सर वाटणार नाहीं. दुसऱ्यांना बरें वाटावें ह्मणून मी दागिनाच काढून ठेवला; पण तुम्ही तर दुसऱ्यांवरचें संकट दूर करण्यासाठी स्वतःला संकटांत पाडून घेतले आहे.” " तर मग मी केलें हैं योग्यच केले असे तुला वाटतें ना ? " 66 होय. त्या माऊलीची अब्रु आपण वांचविली हें खरोखर फार चांगलें केले; पण त्याबरोबर काळजीहि साहजिक वाटते. कुलस्वामिनीच्या कृपेनें हे संकट टळो म्हणजे झाले. पण ती मुलगी इतकी कशी भित्री ? " मग त्या वेळेस ती काय करण्यास समर्थ होती ? 66 99 “ कां बरें ? तिनेंच त्या मेल्याच्या गालफडावर पांच बोटें उठवून द्यावयाला पाहिजे होतीं. अथवा अन्य कांहीं तरी साहस करून आपली सुटका करून घ्यावयास पाहिजे होती. पुष्कळ नीच पुरुष स्त्रियांच्या या भित्रेपणाचाच फायदा घेतात." आपले शहाणपण नेहमीं चुलीजवळ चालविणाऱ्या लक्ष्मीचे हे विचार ऐकून हें नारीहृदय कांहीं विलक्षण आहे, असे दिनकरच्या तेव्हांच लक्षांत आलें. कुसुमाप्रमाणें मृदु आणि वज्राप्रमाणे कठिण अशा दोन्हीहि वृत्ति ·आपल्या स्त्रीच्या ठिकाणी आहेत, हें दिनकरच्या लक्षांत आल्यामुळे त्याला