पान:सुखाचा शोध.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८२ सुखाचा शोध. स्वतःच्या स्त्रीची खरी योग्यता ठरवितां येईना. एक वेळ त्याला अशी गृहदेवता मिळाल्याबद्दल मोठी धन्यता वाटे, तर त्या अशिक्षित स्त्रीची जोड मिळाल्याबद्दल एकवेळ त्याला विपादहि वाटे. आपणास कशी स्त्री मिळावी, ही दिनकरची इच्छा पूर्वीच वाचकांना समजून चुकली आहे. त्यांत मालतीची ओळख झाल्यामुळे तर क्षणोक्षणीं मालतीची आणि लक्ष्मीची तो तुलना करून पाही आणि त्या तुलनेत त्याला निश्चित असे कांहींच ठरवितां येत नसे, तो निराश मात्र केव्हांहि होत नसे, बायकोला शिकवून शिकवून तिला विद्रुपी करण्याची उमेद त्याला अजून होती. पत्नीला कांहीं तरी शिकवावयाचें ही आठवण त्याला जेव्हां झाली, तेव्हां तो ह्मणाला, " माझ्या पत्राचें उत्तर तूं का नाहीं पाठविलेंस १ " लक्ष्मी हंसत हंसत ह्मणाली, " त्या पत्राचें काय उत्तर पाठवावें तेंच मला समजेना. तुमचे ते गोड शब्द आणि ती अलंकारिक भाषा हीं मला कोठलीं साधावयाला ? ह्मणून मीं पत्र पाठविण्याचा विचारच रहित केला. आणि असे कळवावयाचें तरी काय होतें. खुशालीच कळवावयाची होती, ती थोरल्या भावोजींकडून कळलीच असेल ह्मणूनहि मीं पत्र पाठविलें नाहीं. मला पत्र पाठवूं नका, असें मी तुझांला अगोदरच सुचविलें होतें; पण तें कांहीं तुमच्या लक्षांत राहिले नाही. मला स्वतंत्रपणे पत्र आलेले पाहून घरांत सगळ्यानांच आश्चर्य वाटलें. मला तर अगदीं लाजल्यासा- रखें झाले, " लक्ष्मीचे हे शब्द ऐकून दिनकर बराच खिन्न झाला. आतां मात्र मालतीच त्याला अधिक सद्गुणी दिसूं लागली. कांहींसा निराश होऊन त्यानें एक दीर्घ श्वास सोडला आणि आंथरुणावर तो स्वस्थ पडला, चतुर लक्ष्मीच्या लक्षांत पतीच्या या निराशेचें कारण तेव्हांच आलें. ती ह्मणाली, " असे निराश होऊन तुम्ही श्वास कां सोडलां ? " दिनकर ह्मणाला, “ छे: ! तूं उगीच कांहीं तरी म्हणतेस.” लक्ष्मी ह्मणाली, " मी पुष्कळसे लिहिण्यावाचण्यास शिकावें अशी तुमची फार इच्छा दिसते. तुझाला असे कां वाटतें बरें ? " लक्ष्मीचा हा प्रश्न अगदी साधा होता; पण त्या प्रश्नाचे उत्तर दिन-