पान:सुखाचा शोध.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखाचा शोध. पण मुंबईच्या खाणावळीच्या जेवणाचा कंटाळा आल्यामुळेंहि कदाचित् हे पदार्थ चवदार लागत असतील. "" 66 सत्यभामा ह्मणाली, तुझां दोघांचे चेहरे पाहिले ह्मणजे खानावळीं- तील जेवण तुझांस मानवलें नाहीं, असे दिसतें खरें; पण साधें आंबट- वरण तरी खानावळीत चांगले असेल ? " दिनकर हंसत हंसत ह्मणाला, " चांगले ह्मणून काय विचारतेस ! तें वरण कोणत्या डाळीचें केले आहे, हें केव्हांहि समजावयाचें नाहीं. केव्हां केव्हां आमच्या खानावळीत यासंबंधानें बक्षिसहि लागतात. हें बक्षीस अर्थातच स्वयंपाक्याच्या पदरांत पडतें. 'आजचें वरण कोणत्याहि डाळीचें न करतां नुसत्या पाण्याला तिखटमीठ लावून फोडणी दिली आहे,' असें त्यानें सांगितलें हह्मणजे सगळ्यांना साहजिकच आश्चर्य वाटतें. " , दिनकरचे हे शब्द ऐकून सत्यभामा आणि आंत चुलीजवळ बसलेल्या लक्ष्मीला अर्थातच हंसूं आलें. मागचा भात स्वतः लक्ष्मीनेंच वाढला आणि त्यांत मठ्ठाहि तिनेंच ओतला. चांगल्या ताकाला फोडणी वगैरे देऊन उत्कृष्ट मठ्ठा केलेला असल्यामुळे दोघांनीहि लक्ष्मीची प्रशंसा केली. अशा रीतीनें दोघांचीं जेवणें होऊन घरांतले एकंदर वातावरणं शांत झाल्यावर दोघेहि बाहेर फिरावयास गेले. रात्री आठाच्या सुमाराला दोघे परत आ ल्यावर बरोबर आणलेला खाऊ व खेळणीं मुलांमुलींच्या स्वाधीन केल्या वर दिवाकर त्याच्या खोलीत जाऊन निजला. दिनकरहि आपल्या खोलीत जाऊन निजला; परंतु गृहिणी अद्यापि गृहकृत्यें उरकून आंत आलेली नस- ल्यामुळे दिनकरचें मन अस्वस्थ झाले व त्याला झोंप लागेना. तेव्हां त्यानें दिवा लावून एक पुस्तक वाचण्यास आरंभ केला; पण पुस्तकांतहि त्याचें मन रमेना. आमचे पुष्कळ वाचक आतां दिनकरच्या या स्थितीशीं आपल्या स्थितीची तुलना करूं लागतील; पण तसे त्यांनी करूं नये. मोठ्या उत्कंठेनें दिनकर गृहिणीची वाट पहात होता, हें खरें; पण ती उत्कंठा फार निराळी होती. आपण गेल्यापासून गृहिणीची लिहिण्या- वाचण्याच्या बाबतींत किती उन्नति झाली आहे आणि आपण केलेल्या निःस्वार्थ कृत्याचें गृहिणीकडून समर्थन होतें कीं, तीहि मातोश्रीप्रमाणें