पान:सुखाचा शोध.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सातवें 66 'त्या साहेबाने फिर्याद केली असून तुला हणे पोलि- यशोदा ह्मणाली, सनें पकडून नेलें होतें. " 66 होय, नेलें होतें; पण मी आपल्या कर्तव्याला जागलों असल्यामुळे अनेकांनी मला आपण होऊन मदत केली. त्या तिकीटकलेक्टरनें माझ्या वर फिर्याद केली असून नारायणराव जोशी यांनीहि त्याच्यावर फिर्याद केली आहे. भाझी ओळख ना पाळख असे एक भुसावळचे बड़े गृहस्थ मला जामीन राहिले आहेत. आणि या बाबतींत होणारा सगळा खर्च नारायणराव जोशी यांनी करण्याचें कबूल केले आहे. " दिनकरनें असं सांगितल्यावर सगळ्यांच्या जिवांत जीव आला. हा सगळा गोंधळ वास्तविक दिवाकराने केला होता. दिनकरने केलेल्या या बहादुरीची गोष्ट सगळ्यांच्या आधीं घरांत सांगून मोठी शाबासकी मिळ- विण्याचा त्याचा विचार पण साहेबाशी मारामारी आणि पोलिसने दिनकरला पकडले होतें, या दोन गोष्टींनी घरांतील बायका साहजिकच घाबरल्या आणि त्यांनी मोठ्यानें रडण्यास आरंभ केला. आपल्या या कृतीनें भलताच घोटाळा झाला आहे, हे पाहून दिवाकरने हळूच धोतर घेतले आणि तो स्नानासाठी नदीवर निघून गेला. स्नान वगैरे झाल्यावर चोरासारखा गुपचुप घरांत आला आणि सगळें वातावरण शांत झाले आहे असें पाहून जेवण्यासाठी पानावर जाऊन बसला. इतक्यांत दिनकरहि स्नान वगैरे करून पानावर येऊन बसला. बाहेरच्या या भानगडींत लक्ष्मीनें व सत्यभामानें विशेष लक्षच घातलें नाहीं. चारदोन चटकन् होणारे पदार्थ लक्ष्मीने तयार केले आणि सत्यभामेनें दोन्ही पानें वाढलीं. दिवाकर खाली मान घालून गुपचुप जेवत होता. आपल्या पोटांत गोष्ट न राहि- ल्यामुळे घरांत सगळा घोटाळा झाला, असे वाटून त्याचे मन खात होतें. दिनकर मात्र शांतपणे जेवीत होता. आंबट वरणाचे एकसारखे दिनकर भुरके मारीत आहे असे पाहून सत्यभामा ह्मणाली, " दादा, सांग बरें आजचा स्वयंपाक कोणी केला तो ? " दिनकर हळूच हंसून ह्मणाला, “ समजलों. सर्टफिकिटासाठीं तुला मध्यस्थ घातले आहे होय ? पदार्थ बरे झाले आहेत. चवदार लागतात;