पान:सुखाचा शोध.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखाचा शोध. गाडींत गर्दी फार असल्यामुळे धुळ्याचे नारायणराव जोशी वकील यांनी आपली मुलगी बायकांच्या डब्यांत बसविली होती. भुसावळच्या स्टेशनावर गाडी आल्यावर एक तिकिटकलेक्टर त्या डब्यांत गेला आणि त्या तरुण मुलीबरोबर चावटपणा करूं लागला. तेव्हां मी तेथे गेलों आणि त्याच्या पाठीवर असा एक जोराचा ठोसा ठेवून दिला कीं, बायकांची चेष्टा करण्याची आठवण त्याला जन्मभर राहील. आई, तूंच सांग बरें, मी जर त्या वेळी जवळ नसतों किंवा जवळ असूनहि थंड उभा राहिलों असतो, तर त्या मुलीची काय बरें दशा झाली असती ? तिच्या मनाला किती बरें दुःख झाले असतें ? " बायकांप्रमाणे शेजारचे पाजारचे कांहीं पुरुषहि ही हकीकत ऐकत होते. त्यांत चिंतामणी नांवाचा एक तरुण होता. त्याच्या शरीरांत तर संतापानें विलक्षण त्वेष उत्पन्न झाला. तो रागाने म्हणाला, 66 ठीक केलें दिनकरराव. मी असतो, तर त्या नीचाला लाथांनी तुडविले असतें. " असें म्हणून चिंतामणीनें आपला पाय जोरानें जमिनीवर आपटला. आणखी चार दोन पुरुपांनी चिंतामणीप्रमाणेच दिनकरच्या या कृत्याचें समर्थन केलें. घरांतल्या बायकांनाहि दिनकरचें कृत्य प्रशंसनीय वाटले. त्या मुलीच्या ऐवजी आपण असतो आणि आपणावर असा प्रसंग येऊन जर दिनकर- सारख्या परक्या मनुष्यानें आपणास सहाय्य केले असते, तर त्या परक्या मनुष्याचे आपण किती तरी उपकार मानले असते; अशा प्रकारचे विचार घरांतल्या बायकांच्या चित्तावर उमटल्यामुळे त्यांना दिनकरचें कौतुकच वाटलें. त्याच्या आईलाहि त्याबद्दल अभिमान वाटला नाहीं, असें नाहीं; पण वृद्धपणामुळे तिचें रक्त बरेंच थंड झाल्यामुळे ती म्हणाली, बाबा, केलें हैं चांगले केलेंस; पण आतां पुढे कोणी मदत करायला आहे का ? होळीचे होळकर वरें बरें म्हणतील; पण आतां या आलेल्या संकटाशी तुलाच झगडावयाला लागेल ना ? " 66 ८८ दिनकरहि शांतपणे म्हणाला, आई, तूं म्हणतेस तें खरें; पण परि- णामाकडे दृष्टि देऊन समोर दिसत असलेल्या कर्तव्याकडे पाठ करणें, हाहि मूर्खपणा आहे. परमेश्वर जें करील तें करील.”