प्रकरण सातवें. लौकिक बुडविलास.' अशा प्रकारची एकीकडे तिची बडबडहि चालली होती. शेजारच्या पाजारच्या बायकांना काय झाले आणि काय नाहीं, याची देखील माहिती नव्हती. तथापि त्या यशोदेच्या भोंवतीं गोळा झाल्या आणि तिच्याच म्हणण्याचा अनुवाद करूं लागल्या. या एकंदर प्रकाराने दिनकर बराच गोंधळून जाऊन त्रासलेल्या स्वरानें म्हणाला, ही आहे काय भानगड ? काय झालें तें स्पष्ट सांग ना ! आई, तुला बेड तर नाहीं लागलें ? " ७७ यशोदा डोळे पुशित पुशित रागानें म्हणाली, "मूर्खा, साहेबाला मार- लेंस आणि काय झाले म्हणून आणखी विचारतोस ? म्हणूनच तुला पोलि सांनी पकडलें होतें. कारट्या वडिलांचें नांव बुडविलेंस ! 27 आईचे हे शब्द ऐकून दिनकरची काळजी एकदम दूर झाली. आपल्या कालच्या कृत्याची हकीकत घरांत कळल्यामुळे हा सगळा गोंधळ उडाला आहे, हें दिनकरच्या लक्षांत येतांच तो गंभीर स्वरानें म्हणाला, "वडिलांचं नांव बुडविले की, त्यांच्या कीर्तीत भर घातली, तें परमेश्वराला माहीत.” यशोदा अजूनहि स्फुंदतच होती; पण दिनकरचे हे शब्द ऐकून यमुना बरीच निष्काळजी झाली. ती शांतपणे म्हणाली, काकू, दिनकर असें वेड्यासारखें करील तरी कसें ? सगळे त्याच्या वागणुकीची तारीफ कर •तात. दिनकर, काय झालें तें सगळें तूंच नीट समजावून सांग ना. " CC दिनकर म्हणाला, “ अगोदर तुम्हां सगळ्यांचे रडणें होऊं द्या; मग "मला काय सांगावयाचें तें सांगेन. " यशोदा दिनकरच्या पाठीवर हात फिरवून म्हणाली, बाबा, आपण गरीब माणसें नाहीं कोणाचा आश्रय, नाहीं पैशाचें बळ ! अशा स्थितीत हा नसता कारभार आपल्याला कशाला पाहिजे ? " ८८ दिनकर म्हणाला, “ आई, तूं म्हणतेस ते खरें; पण केव्हां केव्हां असें साहस करावेंहि लागतें. समज, आपल्याच घरांतली सत्यभामा नाहीं तर यमुना बायकांच्या डब्यांतून प्रवास करीत असतां जर कोणी वाईट बुद्धीने "त्यांच्याजवळ गेला, तर त्या बायकांची अब्रु वांचविण्यासाठी त्या नीचाला दोन ठोसे द्यावयाला नको का ? भुसावळच्या स्टेशनावर तसेंच झालें.
पान:सुखाचा शोध.pdf/७७
Appearance