पान:सुखाचा शोध.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ सुखाचा शोध. 6: म्हणून ओटीवर सारखा नाचत होता. दिनकरनेंहि गाडींतून खाली उत रल्याबरोबर सदूला उचलून घेऊन त्याचा एक मुका घेतला आणि त्याच्या- सह तो आंत गेला. 'काका, मला चेंडू आणला ?' सदूनें अगदी पहिला प्रश्न दिनकरला हा केला. दिनकर त्याच्या या प्रश्नाचें कांहीं उत्तर देत आहे आणि दिवाकर गाडाँतले सामान घेऊन आंत येत आहे, तोंच सगळ्यांनी ' अरे, काल तुम्ही होतां कुठें ? वाट पाहून पाहून जीव नुसता हुर हुर करूं लागला. काल उमरावतीला का राहिलां होतां ?' दिनकर हंसत हंसत म्हणाला, “आई, आतां अगदीं सणसणून भूक लागली आहे. अंघोळी करून दोन घांस आम्हाला खाऊं द्या. मग सगळे काय ते सांगतों. " यशोदा यावर मोठ्यानें उमाला हांक मारून म्हणाली, " उमा, अगो-- दर चूल पेटवून पिठलंभात कर, आणि लक्ष्मी, बाहेरच्या बंबांत सरपण घालून या दोघांना अंघोळीला पाणी दे." इतकें सांगून यशोदा आंत गेली. यमुना व सत्यभामाहि दिनकरला व दिवाकरला चार दोन प्रश्न करून आंत गेल्या. सामान वगैरे व्यवस्थेनें ठेऊन व कपडे काढून झाल्यावर प्रथम दिवाकर आंत गेला. दिवाकर आंत जाऊन पंधरा वीस मिनिटे झाली असतील नसतील तोंच आंत कांहीं चमत्कारिक गलवला झाल्याचें व त्यावरोवरच आई रडत असल्याचेंहि दिनकरच्या कानावर आलें. विसुकाकांच्या घरांत एकाएकी रडारड सुरू झाल्याची ऐकून शेजारच्या पाजारच्या बायका व पुरुषहि तितक्यांत धांवून आले. हा काय प्रकार आहे, याची कल्पना दिनकरला होण्याच्या पूर्वीच यशोदा घरांतून मोठ्यानें रडत रडत बाहेर आली आणि दिनकरला म्हणाली, "कायरे में केलेंस ! कुळाला कलंक लावलास ! " इतक्यांत यमुना, उमा, सत्यभामा ह्याहि दाराजवळ आल्या आणि डोळ्यांत पाणी आणून स्फुंदू लागल्या. दिनकर अधिकच घाबरून जाऊन. म्हणाला, आई, झाले काय ? तुम्ही सगळी रडतां कां ?” 66 पण दिनकरच्या या प्रश्नाचें उत्तर न देतां यशोदाबाईनें आणखी मोठ्यानें रडण्यास सुरुवात केली. 'कारट्या, वडिलांचें नांव घालावलेंस, घराण्याचा