पान:सुखाचा शोध.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सातवें. ७५ विश्वास असल्यामुळे त्यानें फिर्याद दाखल केली आणि त्यामुळे या सर्व मंडळीस घेऊन पोलीसला म्याजिस्ट्रेटकडे जावे लागले. हे म्याजिस्ट्रेटसाहेब म्हणजे रेल्वे नौकरांचे विशेष चहाते होते. कंपनीकडून त्यांना पहिल्या वर्गाचा मुंबई ते नागपूरपर्यंतचा पास होता. अशा अनेक कारणामुळे त्यांना कंपनीचे हित पाहणें भाग पडे. हे म्याजिस्ट्रेट अकराच्या सुमारास कचेरींत आले. दोन्ही बाजूंची हकीकत ऐकून घेतल्यावर त्यांनी दिनकरला जामिनावर सोडण्याचें कबूल केले. नारायणराव जोशी यांची भुसावळ येथे चांगली ओळख असल्यामुळे दिनकरला जामीन मिळून या सर्व मंडळीची जेवण्याची वगैरेहि व्यवस्था फार चांगली लागली. आमचे पाटीलवोवा दिनकरवर पहिल्या पासूनच खुप होते, त्यांत दिनकरचें हें योग्य साहस त्यांच्या दृष्टीस पडल्यामुळे तर त्यांनी दिनकरच्या धैर्याची फारच तारीफ केली. कांहीं एक ओळख नसतां पाटीलबोवांची ही सहानुभूति पाहून सर्व विद्यार्थ्यांना सकौतुक आश्चर्य वाटले. रात्रभर चांगली विश्रांति घेऊन ही सर्व मंडळी दुसऱ्या दिवशी साडेसहाच्या सुमाराने स्टेशनावर आली व मेलमध्ये बसून उमरावतीकडे निघून गेली. प्रकरण सातवें. आज रामपूर येथील बिसुकाकांच्या घराने विलक्षण औदासीन्य धारण केले होतें. दिनकर आणि दिवाकर हे कालच यावयाचे. पण ते अद्याप न आल्यामुळे यशोदा व घरांतील इतरांना मोठी काळजी वाटत होती. दोघांची चुलत बहीण यमुना तर सारखी आंत बाहेर खेपा घालून दर- •वाजांतून डोकावून रस्त्याकडे लांबवर पहात होती. इतक्यांत सायंकाळी पांचाच्या सुमारानें एक बैलगाडी घराकडे येतांना दिसली व त्याबरोबर् यमुना घरांत जाऊन 'आले हो, दोघेहि आले, ' असें म्हणाली. यमुनेचे हे शब्द ऐकून सत्यभामा, यशोदा आणि यमुना अशा बाहेर येऊन उभ्या राहिल्या. उमाचा मुलगा सदू तर ' काका आले, काका आले,' असे