Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखाचा शोध. सुमान घेऊन अगोदरच खाली उतरली होती. सगळे साक्षीदार दिनकर- च्याच वाजूचे आहेत, असे पाहून स्टेशनमास्तर चिडला. तो पोलिसकडे वळून म्हणाला, “ तिकीटकलेक्टरकडून फिर्याद घ्या आणि ह्या इसमाला म्याजिस्ट्रेटपुढे नेऊन उभा करा. " दिनकरहि पोलीसकडे बळून म्हणाला, " यानें त्या स्त्रीच्या अंगाला हात लावल्याबद्दल मीहि फिर्याद दाखल करतो. " " तुम्ही त्या पोलिसचे नाईक दिनकरकडे रोखून पाहून म्हणाले, स्त्रीचे कोण आहां ? " ७४ ह्रीं इतक्रीं प्रश्नोत्तरें होत आहेत, तो त्या तरुण मुलीला बरोबर घेऊन एक सभ्य गृहस्थ तेथें आले. या गृहस्थाचा पोपाक नीटनेटका असून चेहराहि मोठा रुवाबदार होता. दिनकरने पोलिसला जवाव देण्याच्या आधींच तो पुढे होऊन म्हणाला, " त्या मुलीच्या वतीने मी फिर्याद दाखल करतों. मी तिचा बाप आहे. चार डवे पलीकडून मी येईपर्यंत त्या मुलीजवळून तिकिट घेण्यासाठी या तिकीटकलेक्टरसाहेबांना एवढी घाई झाली होती काय ? हा तिकीटकलेक्टर इतक्या नीच वृत्तीचा आहे, याबद्दल माझ्याजवळ पूर्वांचे चार पांच दाखले आहेत. " नंतर तो दिन- करकडे वळून म्हणाला, “ माझ्या मुलीच्या अब्रूसंरक्षणासाठी आपण जो प्रयत्न केला, त्याबद्दल मी आपला फार अभारी आहे. " दिनकर नम्रपणे म्हणाला, " यांत मी आभार मानण्यासारखे काय केले आहे ! माझें कर्तव्य तेंच मीं केलें. " तो गृहस्थ म्हणाला, “ माझें नांव नारायणराव जोशी. मी धुळे येथे वकिली करीत असतो. आपण कांहीं भिऊं नका. आपल्यावर आलेल्या या संकटाची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. " नंतर तो पोलिसकडे वलून म्हणाला, तुम्ही जर तिकीटकलेक्टरची फिर्याद घेत असाल, तर आम्हांला शक्य तितक्या लवकर म्याजिस्ट्रेटपुढे नेऊन उभे करा, आणि तो नसेल, तर आमची फिर्याद घेऊन आम्हाला मोकळे करा." 66 गांठ अगदींच निराळ्या गृहस्थाशी आहे, हे पाहून पोलिसलाहि जरा विचारच पडला; पण तिकिटकलेक्टरला आपल्या गोन्या कातड्याचा मोठा