Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ फार भरून काढणार होतो. जर आह्मी दोन पुस्तकें सव्वा रुपयांच्या व्ही. पी. नें पाठविलीं असतीं, तर ग्रंथमालेचा खाली लिहिल्याप्रमाणें फायदा झाला असताः- १ आश्रयदात्यांचें नांव लिहिलेला वेष्टणाचा कागद जितका एका पुस्तकाला लागतो, तितकाच दोन पुस्तकांना लागला असता. २ एक वेळच्या पत्ते वगैरे लिहिण्याच्या श्रमांतच दोन पुस्तकें गेलीं असतीं. ३ प्रत्येक आश्रयदात्यांच्या मागें टपालखर्चाच्या दृष्टीनें सुमारें एक आण्याचा फायदा झाला असता. ४ मागें रेंगाळत पडलेली पुस्तकें लवकर लवकर छापून निघाली असती; आणि ५ दोन पुस्तकांची किंमत एकाच वेळी आमच्या हाती पडल्यानें आह्मांस पुढील पुस्तकांसाठी पुष्कळसा कागदहि खरेदी करून ठेवतां आला असता. या इतक्या फायद्यांना मुकावें लागल्यामुळे ग्रंथमालेचें किती नुकसान झाले आहे, याची कोणासहि अटकळ करतां येईल. कांहीं थोड्या आश्रयदात्यांनी भलत्याच शंका घेतल्यामुळे आणि कित्येकांनी कांहीं विलक्षण सूचना केल्यामुळे आज आह्मांस हे एकच पुस्तक आश्रयदात्यांच्या भेटीला पाठ- वावें लागत आहे. एकदम दोन पुस्तकें येतील अशी आशा बाळगणारांची यामुळे पुष्कळ निराशा झाली असेल; परंतु वर लिहिलेल्या कारणांचा विचार करून ते आह्नास क्षमा करतील असा भरंवसा आहे. आह्मी एका नव्या पुस्तकाबरोबर एक जुनें पुस्तक पाठविणार आहों, असा कित्येकांनों गैरसमज करून घेतला, तर कित्येकांनी एका नव्या पुस्तकाबरोबर बाजारांतल्या दुसऱ्यांच्या कादंबऱ्या पाठविणार की काय ? असाहि प्रश्न केला. वास्तविक कादंबरी व चरित्र हीं दोन्हीं पुस्तकें ग्रंथ- मालेतूनच प्रसिद्ध होणार व तीं दोन्हीहि नवीं असणार, हें आह्मी त्या सूचनेत स्पष्ट जाहीर केले होतें. तसेंच कित्येकांनीं सूचनाहि मोठ्या गमती- च्या केल्या आहेत. मी चरित्रांचा भोक्ता आहे, तेव्हां माझ्याकडे फक्त चरित्रेंच पाठवीत जा किंवा मी कादंबरीचा भोक्ता आहे, तेव्हा माझ्याकडे फक्त कादंबऱ्याच पाठवीत जा; अशाहि कित्येकांनी सूचना केल्या आहेत. परंतु या व्यवस्थेनें ग्रंथमालेचें किती नुकसान होणार आहे, याचा मात्र कोणीं विचार केला नाहीं. ग्रंथमालेतून जें प्रत्येक पुस्तक प्रसिद्ध होईल,