पान:सुखाचा शोध.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ तें आश्रयदात्यांनी घेतले पाहिजे असा नियम आहे; आणि असा नियम आहे, ह्मणूनच ग्रंथमालेचें कार्य सुरळीत चालले आहे. इच्छित पुस्तकें ज्यांना पाहिजे असतील त्यांना तो भर किंमतीने देण्यास आह्मी केव्हांहि कवूल आहों. अशीं इच्छित पुस्तकें वर्गणीदारांच्या किंमतीने मिळतील अशी कोणीहि आशा बाळगूं नये. ज्यांनी यापूर्वी फक्त चरित्रे पाठवा किंवा फक्त कादंबऱ्या पाठवा, असे कळविले असेल, त्यांनी या गोष्टीचा शांतपणे विचार करून आपला मनोदय आह्मांस कळवावा. या कादंबरीत बंगालींतल्या सर्वोत्कृष्ट 'ध्रुवतारा' नांवाच्या कादंबरीचें कांहींसें अनुकरण केले आहे. ग्रंथमालेने आजपर्यंत ज्या कादंबऱ्या प्रसिद्ध केल्या आहेत, त्यावरून कथात्मक वाङ्मयासंबंधानें भारत-गौरव-ग्रंथमालेची कामगिरी कोणाच्याहि लक्षांत येण्यासारखी आहे. कसल्या तरी भाकडकथा •प्रणयकथा यांपासून आमच्या कादंबऱ्या अलित असून त्यांत केवळ उच्च कल्पना, उच्च भावना व उच्च हेतु असतात, हे आतां सर्वांच्या लक्षांत आले आहे, व ग्रंथमालेचा गौरवहि सर्वत्र त्याचमुळे होत आहे. चरित्रेंहि अशींच सर्वोत्कृष्ट प्रसिद्ध करावयाची असा आमचा संकल्प आहे, आणि प्रिन्स बिस्मार्कच्या पहिल्या भागावरून ही गोष्ट सर्वांच्या लक्षांत आली आहे. बिस्मार्क आणि नेपोलियन यांची मराठींत चरित्रे नाहीत असे नाहीं; परंतु त्या चरित्रांना चरित्र म्हणण्यापेक्षां तो चरित्राचा आभास होय, असेच म्हणणें सयुक्तिक होईल. अगोदरच मराठी भाषेत चरित्रग्रंथ थोडे आहेत आणि त्यांत चांगली चरित्रें तर फारच थोडीं आहेत कांहीं थोर व्यक्तींची चरित्रें तर इतकी लहान आहेत की, त्यांना चरित्रांची चेष्टा ह्मण- ण्यास देखील हरकत नाहीं. आमचें राष्ट्र उदयोन्मुख असून राष्ट्रांतल्या तरुणांच्या हातीं कोणती पुस्तकें दिली पाहिजेत, ही जवाबदारी टाळण्या- इतकी भारत-गौरव-ग्रंथमाला शिथिल व निरभिमानी नाहीं. प्रिन्स बिस्मार्क, नेपोलियन, कौन्ट टॉलस्टॉय, शिवाजीमहाराज, वगैरे थोर पुरुषांच्या सांगो- पांग चरित्रांची आमचें राष्ट्र उत्सुकतेने वाट पहात आहे, अशी आमची समजूत आहे; आणि म्हणूनच या कार्यास आझी आरंभ केला आहे. आमचे आश्रयदाते या कामी आह्मांस निरुत्साह करणार नाहीत, असा आह्मांस भरंवसा आहे.