प्रकाशकाचे दोन शब्द. भगवान् श्रीकृष्ण यांच्या आशीर्वादानें भारत गौरव ग्रंथमालेचें हें सव्विसावें पुष्प तयार झाले असून तें आह्मी आमच्या आश्रयदात्यांना प्रेमपूर्वक 'सादर करीत आहों. प्रिन्स बिस्मार्क हैं बावीसावें पुष्प प्रसिद्ध झाल्यावर मधली तीन पुष्पें न मिळतां हें सव्विसावें पुष्प एकदम कोठून आलें, याचें कित्येकास आश्चर्य वाटून कित्येकांचा निष्कारण घोंटाळा होण्याचाहि संभव आहे. प्रिन्स बिस्मार्क या पुस्तकाचा पहिला भाग जेव्हां प्रसिद्ध केला, तेव्हां त्या सोबत एक सूचना पत्र जोडून आह्मी आमच्या आश्रय- दात्यांना एक कादंबरी आणि प्रिन्स बिस्मार्क यांच्या चरित्राचा दुसरा भाग अशा दोन पुस्तकांचा स्वीकार करण्यासंबंधानें विनंति केली होती. ही आमची विनंति पुष्कळ आश्रयदात्यांनी मान्य करून आह्मांस योग्य असें प्रोत्साहनहि दिले; परंतु कांहीं थोड्या आश्रयदात्यांनी या बाबतीत आपला बराच गैरसमज करून घेतला आहे, असे आह्मांस दिसून आले आणि ह्मणून या वेळी आह्मांस आमची योजना बदलणें भाग झाले. कांहीं थोड्या आश्रयदात्यांचा देखील ग्रंथमालेवर रोष होऊं नये, अशी आमची इच्छा असल्यामुळे प्रिन्स बिस्मार्क यांच्या चरित्राचा दुसरा भाग तयार होण्यास अगदी थोडा अवकाश उरला असतांहि त्या अगोदर तयार झालेले 'सुखाचा शोध' हैं पुस्तक आश्रयदात्यांकडे प्रथम पाठावले आहे. प्रिन्स बिस्मार्कचा दुसरा भाग आणि सुखाचा शोध, हीं दोन पुस्तकें एकाच व्ही. पी. ने पाठविण्याचा उद्देश कोणता, हे आह्मी विनंतीपत्रांत स्पष्ट नमूद केलें होतें. युरोपांतल्या महायुद्धानें मुद्रण सामग्री प्रत्येक क्षणीं महाग होत असून ग्रंथप्रकाशनाचा धंदा अधिकाधिक विकट होत चालला आहे. युद्धापूर्वी जो कागद दोन अडीच आणे रत्तल होता, तोच आतां आठ नऊ आणे रत्तल मिळतो; आणि याच न्यायानें बाकीच्या वस्तूहि महाग झाल्या आहेत. अशा स्थितींत आठ आण्यांस दोनशें सव्वा दोनशें पानांचें पुस्तक देणे अशक्य असल्यामुळे आश्रयदात्यांवर किंमतीचा बोजा न वाढवितां एकदम दोन पुस्तकें पाठवून आह्मी आमचें नुकसान था
पान:सुखाचा शोध.pdf/५
Appearance