प्रकरण चवथें. असतें कीं, माझ्या मानससरोवरावरून राजहंस दूर दूर जाऊन जणूं अदृश्य झाला. तें जाऊं दे दिनकर; पण ही शिष्यीण सुस्वरूप आहे कीं, ती घरची शिष्यीण सुस्वरूप आहे ?" ४५ दिनकर म्हणाला, " पुन्हां तुमची चेष्टा सुरू झाली. ही असली सौंदर्याची तुलना करून काय करावयाचें आहे ?" विश्वनाथ म्हणाला, “ कां बरें, एका फुलाबरोबर दुसऱ्या फुलाची तुलना करण्यास काय हरकत आहे? सांग, लाजू नकोस. या दोघांत अधिक सुंदर कोण आहे ? " दिनकरचा नाइलाज झाला; तो म्हणाला; “ केवळ शरीरसौंदर्याच्या दृष्टीनें म्हणाल, तर आमच्याच राणीसरकार श्रेष्ठ ठरतील; पण मानसिक सौंदर्याच्या दृष्टीने मालतीचाच नंबर वर लागेल, " आणि तूं शरीरसौंदर्यापेक्षां, हें मानसिक सौंदर्यच पांडुरंग म्हणाला, अधिक पसंत करतोस ? 99 दिनकर म्हणाला, “होय. माझ्या मनाचा ओढा त्याच बाजूला आहे.” रामभाऊ म्हणाला, “ दिनकर, नीट विचार करून वाग. त्या घरच्या लक्ष्मीची माती करूं नकोस. " 66 दिनकर त्रासून म्हणाला, तुमच्या थट्टेला कांहीं मर्यादा आहे कारे?" विश्वनाथ म्हणाला, “ दिनकर, आमच्या थट्टेला मर्यादा असो वा नसो; पण लक्षांत ठेव. डोन्ट फॉल इन लव्ह वुइथ हर. " असे म्हणून विश्वनाथ उठला आणि बरोबरच्या स्नेह्यांसह आपल्या बिहार्डी निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीं रोजच्याप्रमाणे वामनरावांच्या बंगल्यावर मुलांना शिकविण्यासाठीं दिनकर गेला. वामनरावांचा बंगला लहानसाच पण सोइस्कर व शोभिवंत होता. बंगल्याच्या सभोवत सुंदर बगीचा असून त्यांत नाना प्रकारचीं फुलझाडे लावलेलीं होतीं. हा बंगला दुमजली असून खालच्याच मुख्य दिवाणखान्याच्या शेजारच्या खोलींत दिनकर मुलांना शिकवीत असे. या बंगल्यांतील प्रत्येक खोली व प्रत्येक दिवाण- खाना अगदी अलीकडच्या पद्धतीप्रमाणे शृंगारलेला होता. बहुतेक खोल्यां तून व दिवाणखान्यांतून खुर्च्या, टेबलांची बैठक असून भिंतीवर अनेक
पान:सुखाचा शोध.pdf/४५
Appearance