Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखाचा शोध. रामभाऊ ह्मणाला, “ तूं कांहीं तिच्याकडे पाहिलें नाहींस; पण तिनें तुझ्याकडे पाहण्यास कमी केले नसेल ? दिनकर जरा रागानें ह्मणाला, “ चेष्टा कोठें करावी आणि कोठें करूं नये, हें तरी तुम्हांला समजतें कारे ? " पांडुरंग ह्मणाला, यांत चेष्टा ती कसली ? घडलेली एकंदर हकी- कत आमच्याजवळ सांगावयाला एवढा लाजतोस कां ? सांग, ती तुझ्या- कडे पहात होती ना ? " ४४ दिनकर ह्मणाला, “ छे ! तीहि खालीं मान घालूनच उभी होती. ती माझ्या पायाकडे पहात होती आणि मी तिच्या पायाकडे पहात होतों. • वामनराव तेथून निघून गेल्यावर मी तिला एका खुर्चीवर बसण्याविषयीं सुचविलें. ती लाजत लाजतच खुर्चीवर बसली. ही तिच्याकडे पाहण्यास संधी बरी होती; पण मीं एका पुस्तकावर नजर ठेवून तिला एक दोन प्रश्न केलें. शाळेत कोणकोणती पुस्तकें अभ्यासासाठी नेमलेलीं आहेत, असें मी तिला विचारलें, तेव्हां तिनें गोड स्वराने आणि मोजक्या शब्दांत मला त्या पुस्तकांचीं नांवें सांगितलीं. " 66 विश्वनाथ ह्मणाला, तुझे कान त्या वेळीं तिचे ते वीणानिनादित शब्द ऐकून फार संतुष्ट झाले असतील ? कोणकोणत्या पुस्तकांचीं नांवें तिने सांगितलीं, हे काहीं त्या वेळीं तुझ्या लक्षांत आलें नसेल ? " 66 दिनकर ह्मणाला, तुमच्या या चेषेचा प्रतिध्वनि बाहेर पसरला, तर माझ्या शिकवणीवर पाणी पडावयाचें. " पांडुरंग ह्मणाला, " त्याबद्दल तुला काळजी नको, आणि रसिक माण- सांना स्वतःची चेष्टा देखील फार आवडते. ती देखील तुझ्याचसारखी रसिक असेल नाहीं ? तूं तेथून उठेपर्यंत ती तशीच खुर्चीवर बसली होती का ? दिनकर ह्मणाला, “ नाहीं. " तुम्हांला जे काय विचारावेंसें वाटेल, तें मला खुशाल विचारीत जा' असें मीं म्हटल्यावर ती 'बरें' म्हणून तेथून चालती झाली. " रामभाऊ म्हणाला, " मी जर तेथें असतों, तर मला असे वाटले 1