प्रकरण चवथें. दिनकर हंसत हंसत ह्मणाला, “ अडीच मुलांना " त्याबरोबर सगळे विद्यार्थी खो खो हंसूं लागले. विश्वनाथ ह्मणाला, " हैं अडीच मुलांचें काय गौडबंगाल आहे ? " ४.३ दिनकर ह्मणाला, “ येथे चौपाटीच्या बाजूला एक लहानसा स्वतंत्र बंगला आहे, तेथें माझी ही शिकवणी आहे. त्या गृहस्थाचें नांव वामनराव. ते मोठे सुधारक ह्मणून येथे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या एका मुलाचें नांव वसंत आणि दुसऱ्याचें नांव मदन, एक इंग्रजी पहिलींत असून दुसरा तिसरींत आहे. या दोघांना रोजच्याप्रमाणे शिकवीत असतां तीन चार दिव- सांनीं बरोबर एका पंधरा सोळा वर्षांच्या मुलीला घेऊन वामनराव मुलांना शिकवावयाच्या खोलीत आले आणि ह्मणाले, 'मास्तर, ही माझी सग- ळ्यांत वडील मुलगी. हिचें नांव मालती. ही येथील झनानामिशनच्या हायस्कुलांत जाते. यंदा ती चवथतून पांचवीत गेली असून तिनें पहिल्या नंबरचें बक्षीसहि मिळविले आहे. हिला कांहीं रोज नियमानें शिकवायला नको. तिनें कांहीं विचारलें, तर तेवढे तिला नीट समजावून सांगत जा म्हणजे झालें. मीहि त्यांना बरें ह्मणून ह्मणालों. आतां या अडीच विद्या- यचा अर्थ आला ना तुमच्या लक्षांत १ " 66 विश्वनाथ ह्मणाला, तूं हें मग आम्हांला इतके दिवस सांगितलें कां नाहींस ? छेः ! अगदींच अरसिक ! ” "C रामभाऊ ह्मणाला, वा ! मोस्ट रोम्यांटिक. ही शिकवणी तुला मग मोठी काव्यमय मिळाली म्हणावयाची. मुलीचें वय किती ह्यणालास १" पांडुरंग ह्मणाला, “ पंधरा सोळा वर्षांचे ह्मणून त्यानें मघांच नाहीं का सांगितलें ? " विश्वनाथ ह्मणाला, हो हो; त्यानें मघांच सांगितलें खरें. कारे दिन- कर, मुलगी दिसावयाला कशी आहे ? 66 दिनकर ह्मणाला, " तिच्याकडे जितकी नजर पुरवायला पाहिजे होती, तितकी काहीं भी पुरवली नाहीं. तिच्याकडे तशा रीतीनें पाहणें मला चमत्कारिक वाटले. पण मला वाटतें, ती सुस्वरूपच असावी. वर्णानें ती गोरी असून बांध्यानेंहि ती मला सुबक दिसली. "
पान:सुखाचा शोध.pdf/४३
Appearance