Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ सुखाचा शोध. त्याचें जमलें नाहीं. त्या घरांत ज्या मुलाला दिनकर शिकवीत असे, त्याला सरखी आई नसून सावत्र आईं होती. ती त्या मुलाचा निष्कारण द्वेष करी. प्रसंगवशात् दिनकरनें तिच्यावर यथास्थित तोंडसुख घेऊन त्या मुलाचा कैवार घेतला. पण हे मुलाच्या बापाला पसंत पडलें नाहीं. द्वितीयसंबंधा- च्या लाडक्या स्त्रीचा हा अपमान त्याला सहन न होऊन त्याने दिनकरला रजा दिली. या वेळींहि दिनकर एक नवा धडा शिकला. दिनकरच्या या अशा स्वभावामुळे त्याच्या स्नेह्यांनी त्याला शिकवणी शोधण्याच्या नाद अर्थातच सोडला. दिनकराला मात्र आणखी निदान दहा रुपयांची तरी सोय करणे भाग झाल्यामुळे त्याचा शिकवणी शोधण्याचा प्रयत्न चालला होता आणि सुमारें दहापंधरा दिवस गेल्यावर त्याला एक चांगली शिकव- णीहि मिळाली. ही शिकवणी मिळून सात आठ दिवस झाल्यावर एका रविवारीं त्याच्या खोलींत रामभाऊ, विश्वनाथ आणि पांडुरंग हे तिघे हजर झाले. चौघे एकत्र झाल्यावर अर्थातच मग निरनिराळ्या विषयांवर वाद- विवाद सुरू झाले. अनेक प्रकारचे वितंड वाद झाल्यावर मुद्यावर गोष्ट आली. रामभाऊ ह्मणाला, बरें दिनकर, ही तुझी नवी शिकवणी तरी बरी आहे का ? येथें तरी कांहीं दिवस टिकून राहशील का ? " 66 दिनकर ह्मणाला, " तें आतांच मी काय सांगूं; पण येथून मला लव- कर अर्धचंद्र मिळणार नाहीं, असे वाटते. कारण ज्या गृहस्थांच्या घरी मी शिकवावयाला जात असतों, त्यांच्या आणि माझ्या स्वभावांत बरेंच साम्य आहे. गृहस्थ मोठा दिलदार व विद्वान् दिसतो. आतां हा त्याचा दिल- दारपणा वरकांती आहे कीं, खरा आहे, तें हळूहळू प्रत्ययास येईलच. 33 " म्हणजे येथेंहि दोन हात करण्याचा प्रसंग आला, तर तुझी तयारी आहे, असें दिसतें? ” "होय. ही तयारी तर सगळ्या ठिकाणीं पाहिजे. तुझांला एकदां अन्याय सहन करण्याची संवय झाली, म्हणजे तुमच्या डोक्यावर ओझींच्या ओझीं येऊन पडतील. " पांडुरंग ह्मणाला, " तें असो; पण तुला येथें किती मुलांना शिकवावें लागतें ? "