पान:सुखाचा शोध.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण चवथे. ४१ प्रेम होतें. पाश्चात्य संस्कृतीचें आणि आर्य संस्कृतीचें सीमश्रण झालें पाहिजे, असे त्याचें मत असून त्याच्या एकंदर स्वभावांतील विशेष हाच होता. प्रपंचाचा खर्च बराच आहे, तेव्हां आपल्या व आपल्या भावाच्या शिक्षणाचा बोजा वडील बंधूवर पडूं नये अशी त्याची इच्छा होती या बाबीचा विचार करीत असतां सकाळी तास दोनतासांची कोठें तरी शिक- वणी पत्करावी असे त्याला वाटू लागले. त्याचे स्नेही रामभाऊ, पांडुरंग व विश्वनाथ यांनाहि हा दिनकरचा बेत पसंत पडला आणि तेहि एकादी चांगलीशी शिकवणी त्याच्यासाठीं शोधूं लागले. सुदैवाने लवकरच दिन- करला एक शिकवणी लागली; पण दिनकरला तेथें लवकरच निरोप मिळाला. याचे कारण दिनकरचा तेजस्वी स्वभाव हे होय. मुंबईला एक बडे गृहस्थ ब्यारिस्टरीचा धंदा करीत असून सुधारक ह्मणूनहि प्रसिद्ध होते. यांच्या दोन मुलांना दिनकर दररोज शिकवावयाला जात असे. एके दिवशीं ब्यारिस्टरसाहेबांचा आणि त्यांच्या स्नेह्यांचा स्वदेशी वस्तु वापरण्याच्या निग्रहासंबंधानें वाद चालला होता. ब्यारिस्टरसाहेब एकंदर पाश्चात्य वस्तूंची तारीफ करीत असून स्वदेशी चळवळ हे एका प्रकारचें खूळ आहे, असे प्रतिपादन करीत होते आणि त्यांचें स्नेही देशांतल्या गोरगरीबांना अन्न मिळावें ह्मणून ही चळवळ पाहिजे, असे प्रतिपादन करीत होते. या वादांत ब्यारिस्टरसाहेबांचा पराभव होण्याची वेळ आल्यामुळे ते दिनक रला ह्मणाले, “ काय हो, तुमचें या बाबतींत काय मत आहे ? ” 66 ब्यारिस्टरसाहेबांना वाटलें, दिनकर आपला नोकर आहे, तेव्हां आप ल्याच बाजूचें मत देईल; पण तसे झाले नाहीं. तो ह्मणाला, आमच्या स्वदेश बांधवांनी उपाशीं मरूं नये अशी इच्छा असल्यास या स्वदेशी चळवळीचें संगोपन आम्ही आवश्य करावयाला पाहिजे. " दिनकराच्या या उत्तरानें ब्यारिस्टरसाहेब अर्थातच गरम झाले. त्या वेळेस ते कांहीं बोलले नाहींत; पण दुसऱ्या दिवशीं त्यांनीं दिनकरला हळूच रजा दिली. पाश्चात्य संस्कृतीचा अभिमान बाळगणारी माणसें किती उदार प्रकृतीचीं असतात, याचा दिनकरला हा पहिला अनुभव आला. या नंतर दुसऱ्या एका ठिकाणीं दिनकराला शिकवणी मिळाली; पण तेथेंहि सु० शो० - ३