Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४० सुखाचा शोध. आपली स्त्री बुद्धिवान्, चतुर व दक्ष आहे, हे त्याच्या लक्ष्यांत आले; पण ती उच्च भावनांनी अलंकृत नाहीं, काव्यमय विचार तिला ठाऊक नाहींत आणि तिची प्रतिभा अगदींच हलक्या प्रतीची आहे, असे त्याला वाटू लागले. या बाबतींत त्याच्या अंतःकरणांत समाधानापेक्षां उद्योगच अधिक उत्पन्न झाला. आशेपेक्षां निराशाच अधिक दिसूं लागली आणि भावी दांपत्यसुखाचा चित्रपट त्याला चित्ताकर्षक न दिसतां भेसूरच अधिक दिसूं लागला. स्वप्नसृष्टीत संचार करणारा दिनकर कोणीकडे आणि व्यव हारांत अगदर्दी कांटेतोलपणाने वागणारी लक्ष्मी कोणीकडे. दोघांत किती तरी तफावत होती. प्रकरण चवथें. दिनकर व दिवाकर हे दोघेहि मुंबईस आल्यावर बरोबर आणलेल्या पैशांतून त्यांनी अगोदर कॉलेजची फी भरून एक लहानशी खोली भाड्याने घेतली व एका साधारण प्रतीच्या खाणावळींत ते जेवण्यास जाऊं लागले. दिनकरनें एकंदर पैशांचा हिशोब करून जरा दूरवर दृष्टि देऊन पाहिल्यावर त्याच्या डोळ्यापुढची स्वप्नसृष्टि हळूहळू नाहींशी होऊन प्रत्यक्ष व्यवहाराशीं त्याचें तादात्म्य होऊं लागलें. दिनकरच्या स्वभावांत अनेक प्रकारच्या मनोवृत्तीचें मिश्रण झाले होतें, हें मागें सांगितलेच आहे. आपली पत्नी अशा अशा प्रकारची असावी, असे त्याला बाटे हें खरें; पण तेवढ्यावरून तो स्वार्थी किंवा विलासलोलुप होता, असें अनुमान करणें मात्र चुकीचें होईल. वडील त्याच्या शिरावर होते, तेव्हां देखील तो अगदीं साधेपणाने वागत असे. त्याची प्रकृति पूर्वीपासूनच कंटक असून संवयीनें ती त्यानें अगदी निकोप केली होती. व्यसन असे त्याला सुपारीच्या खांडाचें देखील नव्हतें. आपल्या गोरगरीब स्वदेशबांधवांविषयीं त्याच्या मनांत फार कळकळ असून आपल्या मातृभूमीवर त्याचें विलक्षण