प्रकरण दुसरें. ३१ घरें ह्याच खरोखर स्त्रियांच्या शाळा होत. त्यांतून तुझें घर तर अगदी कित्ता घेण्यासारखे आहे. कुटुंबवत्सल गृहस्थांच्या घरांत जे विविध शिक्षण मुलींना सहज मिळतें, तें कोणत्याहि शाळेत मिळणार नाहीं. अन्नपूर्णा- काकू आणि विसूकाका यांसारखीं शिकविणारी माणसे ज्या घरांत आहेत, त्या घरांतल्या मुलींना मानसिक सौंदर्यासाठी शाळेत पाठविणें म्हणजे अमृत सोडून मोरींतला गाळ चाटांवयाला जाणें होय. " (( विश्वनाथ ह्यणाला, रामभाऊ, तूं ह्मणतोस तें खरें; पण हल्लींच्या युगांत केवळ गृहशिक्षणानें कसें भागेल ? जुलियस सीझरच्या बापाचें नांव काय ? सॅघालीन बेट कोठे आहे ? यांसारख्या प्रश्नांची उत्तरें जर अली- कडच्या मुलींना देतां आली नाहीत, तर आमच्या समाजांत कोण अनर्थ उडेल, याची कांहीं तुला कल्पना आहे ? " " दिन- दिनकर कांहींच बोलत नाहीं, असें पाहून पांडुरंग ह्मणाला, कर, तुझी काकू आणि वडील हीं दोघेंहि वृद्ध झाली आहेत, तेव्हां त्या बिचाऱ्यांच्या मनाला वाईट वाटेल, असें कांहीं करूं नकोस म्हणजे झालें. त्यांच्या पश्चात् तुला काय करावयाचें असेल, तें खुशाल कर. या पाश्चात्त्य शिक्षणापासून जें तेज आम्ही संपादन करावयाला पाहिजे होतें, तें तर कांहीं केलें नाहीं; पण त्यांतलें विष तेवढे घेतले आहे. बेपर्वाई, स्वार्थ आणि विलासलोलुपता या विषांनी आह्मां पुरुषांची शरीरें कुजलीं आहेत, तेवढीं पुरें, आणखी हें विष स्त्रियांत तरी आतां कालवू नका. त्यांना तरी सुखा- समाधानानें आपलीं गृहकृत्ये करूं द्या. " रामभाऊ ह्मणाला, " पण स्त्रियांनी गृहकृत्यें करणें म्हणजे हमाली करणें, असें आमच्या दिनकरला वाटतें. स्वयंपाक ! छे ! कोण हें निंद्य- कृत्य ! दळणकांडण ! ही तर शुद्ध हमाली ! त्यापेक्षा स्वयंपाकी ठेवून हीं कामें भागवावीत किंवा दुकानांतले कुजकेंनासकें अन्न खावून आनंदाने दिवस काढावेत; पण स्त्रियांवर जुलूम होता कामा नये. अहो, यत्र नार्य- स्तु पूज्यंते रमंते तत्र देवताः हे तत्त्व विसरून चालेल कसे ? " पांडुरंग ह्मणाला, " तो बिचारा ब्रह्मदेव एकाद्या ऑनररी म्याजिस्ट्रेट सारखा कोठें दृष्टीस पडत नाहीं, हें नशीब ! नाहीं तर स्त्रियांच्या मानसिक
पान:सुखाचा शोध.pdf/३१
Appearance