३२ सुखाचा शोध. सौंदर्यासाठी दिनकरसारखे प्रतिभासंपन्न गृहस्थ गर्भारपणाचे ओझें पुरु- षांवर टाकावें ह्मणून अर्ज करावयाचे. " या विद्यार्थ्यांचा अशा रीतीनें चालतां चालतां बराच विनोद चालला होता. दिनकरहि मधून मधून त्यांना योग्य तीं उत्तरे देत होता. अखे रीस ही सर्व मंडळी एका लहानशा नद्रीच्या कांठीं बसली व तेथें बरोबर आणलेले फराळाचें फस्त करून नंतर रमत रमत घरी परत आली. दिन- करच्या आग्रहानें ही विद्यार्थी मंडळी आणखी सात आठ दिवस त्याच्या घरी राहिली आणि नंतर ते सर्व उमरावतीस गेले. उन्हाळ्याची सुटी संपून कॉलेज सुरू झाल्यावर पुन्हा हे सर्व विद्यार्थी दिनकरसह मुंबईस येऊन दाखल झाले. मुंबईस आल्यावर त्याच चाळीतल्या जेवण्याच्या जागेत एक थाटाची मेजवानी विद्यार्थ्यांनी झोडली, हें निराळें सांगावयाला नको. खर्च मात्र दिनकराला करावा लागला. प्रकरण तिसरें. विसूकाकांचे वय वरेंच झाले होतें. अन्नपूर्णाकाकू तर त्यांच्याहि पेक्षां वृद्ध होत्या. हीं दोन पिकलेली पानें केव्हां गळून पडतील, याचा कांहीं आतां भरंवसा उरला नव्हता आणि झालेंहि तसेंच. दिनकरचें लग्न मनाप्रमाणे पार पडल्यामुळे विसूकाकांच्या जीवावरचें दडपण निघाल्यासारखें झाले होते आणि अशा रीतीनें मन स्वस्थ झाल्यामुळे सर्व मंडळीसह काशी- यात्रेला जाण्याचा त्यांचा विचार चालला होता. एकदां विश्वेश्वराचे दर्शन आणि गंगेचें स्नान घडावें अशी अन्नपूर्णाकाकूंचीहि फार इच्छा होती; पण पैशाच्या अडचणीमुळे त्यांनी या बाबतींत विसूकाकांना फारसा तगादा केला नाहीं. दिनकरच्या लग्नाला अजमासापेक्षां बराच कमी खर्च लागल्या- मुळे हा काशीयात्रेचा बेत विसूकाकांनीं ताबडतोब ठरविला व ते बरोबर अन्नपूर्णाकाकू, पत्नी व दिवाकर यांना घेऊन यात्रेला निघून गेले. प्रथम ही सर्व मंडळी हरिद्वारला गेली आणि तेथून यात्रा करीत करीत काशीला
पान:सुखाचा शोध.pdf/३२
Appearance