पान:सुखाचा शोध.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विश्वनाथ चेष्टेनें ह्मणाला, पांडुरंग, तुला कांहीं समजत नाहीं. चटण्याकोशिंबिरी करतां आल्या म्हणजे कांहीं गृहिणीपदाची योग्यता येत नाहीं. 35 सुखाचा शोध. 66 रामभाऊ कुचेष्टेनें ह्मणाला, “ हां, हें खरें, आपला संसार करतां आला नाहीं तरी हरकत नाहीं; पण बाजाची पेटी वाजवितां आली किंवा एकाद्या सभेत भाषण करून टाळ्या मिळविल्या, तरच गृहिणीपदाची योग्यता येते. मग घरांतली मुलेबाळें कच्चें अन्न खाऊन अजारी पडलीं तरी हरकत नाहीं. " पांडुरंग ह्मणाला, " अरे; पण दिनकरचें म्हणणे ऐकून घेतल्यावांचूनच ही एवढी त्याच्यावर टीका कां ? दिनकर, तुझें या बाबतीत काय म्हणणें आहे ? " 46 दिनकर ह्मणाला, तुम्हां चेष्टा करणारांना माझे म्हणणे पटावयाचें नाहीं. स्त्री गृहकृत्यांत दक्ष असली आणि ती सुंदर असली म्हणजे तुझांला सर्व कांहीं मिळाले, असे वाटतें; पण ही केवळ बाह्य दृष्टि होय. मुख्यतः मानसिक सौंदर्याकडे पाहिले पाहिजे-अॅकॉम्प्लीझमेंट -पाहिजे. 22 विश्वनाथ ह्मणाला, 66 मग त्याबद्दल तूं आतां खटपट कर. तुला पाहिजे तसे तिचें मानसिक सौंदर्य घडीव म्हणजे झालें. तूं तसा प्रतिभा- संपन्न आहेसच आणि तीहि कांहीं अज्ञान नाहीं. तिच्या बापाने तिचें वय अकराबारा वर्षीचें सांगितलें; पण ती खरोखर तेरा चवदा वर्षांची असावी. तिच्या गुरूचें नातें तुझ्याकडे आतां आले आहेच. दिनकर मनःपूर्वक ह्मणाला, “ तें खरें; पण मला तरी वेळ कोठे आहे? तिला एकाद्या बोर्डिंग स्कूल मध्ये ठेवावें असे मला वाटतें; पण घरांत कोणाला माझें हे म्हणणे पसंत पडावयाचें नाहीं. " दिनकरचे हे शब्द ऐकून रामभाऊ एकदम रागानें ह्मणाला, बोर्डि- गस्कूल म्हणजे नीति देवतेचें मंदिर आणि आह्मां गृहस्थांची घरे म्हणजे हमालखाने ! दिनकर, या असल्या काव्यमय विचारांनीं वेडा होऊन त्या निर्बोध बालिकेची माती करूं नकोस. वेड्या, आपणासारख्या गृहस्थांच ८८