पान:सुखाचा शोध.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें. २९ होते; पण त्याला अनुभव निराळाच आला. रामाच्या घरांत तो पाऊल टाकतो, तो रामा भाजीभाकर खात बसलेला त्याला दिसला. तो ह्मणाला, रामा, घरीं चल. बाबांनी तुला जेवावयाला बोलाविले आहे. " 66 रामा ह्मणाला, “ भाऊसाहेब, हे मी कोणाचें खात आहे? आपलेंच खात आहे. घरीं येऊन जेवण्यांतच अधिक तें काय आहे ? १ आतां मात्र दिवाकराला मानापमान ही काय चीज काहे, ते कळून आले. त्यानें रामाला पुष्कळ विनाविलें; पण रामानें जेवण झाल्याचें निमित्त करून जाण्याचें टाळले. निरुपाय होऊन रामाचा नकार विसू- काकांना दिवाकरानें कळविला. विसूकाका दिवाकरावर पुष्कळ रागावले आणि स्वतः रामाला बोलावण्यास गेले. विसूकाकांना दाराशी पाहतांच रामाचा सगळा अभिमान विलयाला गेला आणि तो मोठ्या आनंदानें जेवण्यास आला. विसूकाकांची ही थोर वृत्ती पाहून कॉलेजांत शिकणाऱ्या त्या तिघांहि विद्यार्थ्यांना मोठें नवल वाटलें. ही जेवणावळ होऊन दोन तीन दिवस झाले, तरी वरील विद्यार्थ्यांना उमरावतीस जाण्याला परवानगी मिळेना. आणखी आठ दिवस तरी रहावें, असा विसूकाकांनीं आग्रह धरल्यामुळे ते तिघेहि त्याप्रमाणे राहिले होते. लग्नासाठी आलेल्या पाहुणे मंडळींतहि त्यांच्या वयाचे समवयस्क असे कांहीं तरुण होते. ही सर्व तरुण मंडळी बरोबर फराळाचें वगैरे घेऊन सायंकाळच्या वेळीं दूर- वर फिरावयाला जात असे. एके दिवश रोजच्याप्रमाणे ही मंडळी दिन- करसह बाहेर फिरावयास गेली असतां वाटेनें दिनकरच्या लग्नासंबंधानेंच बोलणें निघालें. रामभाऊ ह्मणाला, “ कांरे दिनकर, स्त्री म्हणजे अशी असली पाहिजे नी तिला अमुक गोष्टी समजल्या पाहिजेत, वगैरे तूं बरीच बडवड करीत होतास. मला वाटतें, तुझ्या समजुतीपेक्षांहि तुला अधिक चांगली बायको मिळाली. खरें ना ? ” दिनकर कांहींसा गंभीर होऊन ह्मणाला, “ चांगली म्हणजे कशी ? स्वरूपानेंच ना ? " पांडुरंग ह्मणाला, “आणि गृहकृत्यांतहि ती फार दक्ष आहे."