पान:सुखाचा शोध.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ सुखाचा शोध. कांहीं तरी ' रोम्यांटिक' नांव पत्नीचें ठेवावयाचें त्याच्या मनांत होते; पण त्यांच्याच बहिणी वगैरे विरुद्ध गेल्यामुळे लक्ष्मी या निरस नांवानेंच त्याला लग्नांतले व्यवहार करावे लागले. लग्नसमारंभ आटोपल्यावर बरोबर लक्ष्मीला घेऊन ही सर्व मंडळी रामपुराला परत आली. गांवांतल्या ओळखीच्या लोकांचा रुसवा राहूं नये ह्मणून विसूकाकांनी एक मोठी गांवजेवणावळ देण्याचे ठरविलें होतें व ती जेवणावळ होईपर्यंत दिन- कराने आपल्या तिघां स्नेह्यांना ठेवून घेतले होतें. आदितवारीं ही जेवणा- वळ फारच संतोषकारक रीतीने पार पडली. विसूकाकांची दक्षता व थोरपणा हीं या वेळीं या तिघां स्नेह्यांच्या चांगलीं नजरेस आली. गांवांतील ब्राह्मण, वाणी, उदमी, मराठे वगैरे झाडून साऱ्या परिचित गृहस्थांना जेवण्यास बोलावण्यांत आले होतें. जातीरिवाजाप्रमाणे निरनिराळ्या पंक्ती केल्या असून जागेच्या अडचणीमुळे त्या निरनिराळ्या वेळीं बसविण्यांत आल्या होत्या. आमंत्रण देण्याचें काम भास्कर व दिवाकर या दोघांवर सोपविण्यांत आलें होतें. विसूकाका वेळोवेळीं याद्या तपासून कोण आला, कोण नाहीं, तें पहात होते. इतक्यांत त्या गांवचा रामा धोबी अद्याप जेवण्यास आला नाहीं, असे त्यांच्या लक्षांत आले. त्याबरोबर ते दिवा- कराला हांक मारून म्हणाले, " अरे दिवाकर, त्या रामा धोब्याला बोला- वणें केले होतेस ना ? " दिवाकर उमरावतीस हायस्कुलांत सातव्या इयत्तेत शिकत असल्यामुळे आणि प्रत्येक परीक्षेत पहिल्या नंबरांत पास होत गेल्यामुळे उच्च नीच भावनांनी बराच शेफारून गेला होता. तो झणाला, "तो आपल्या घरी रोज येतो, तसा आजहि येईल आणि जेऊन जाईल. त्याला निराळे असे आमंत्रण कशाला द्यावयाला पाहिजे ? " विसूकाका जरा रागावून म्हणाले, तो आपल्या घरचा नौकर झाला, ह्मणून त्याला कांहीं मानापमान नाहीं वाटतें ? जा, अगोदर जा आणि त्याला जेवावयाला घेऊन ये." " अरे शहाण्या, दिवाकराने लागलीच डोक्यावर टोपी ठेवली आणि तो तसाच रामा धोब्याच्या घरीं गेला. बोलावल्याबरोबर रामा येईल असे त्याला वाटले