प्रकरण दुसरे vf लागणार नाहीं." असें ह्मणून विसूकाका दिनकरच्या उत्तराचा वाट पाहूं लागले; पण दिनकर कांहींच बोलला नाहीं. तेव्हां विसूकाका पुन्हा म्हणाले, मग वैशाख शु।। १० चा मुहूर्त कायम करण्याबद्दल मी गोपाळरावांना लिहूं ना ? " 66 " हो. " एवढेच उत्तर देऊन दिनकर घरांत निघून गेला. वडिलांचें म्हणणें त्याला सर्वथा पटलें. आपल्या मनांतल्या सर्व गोष्टी शिकण्यासारखी मुलगी आहे, हे त्यानें स्वतःच पाहिलेले असल्यामुळे वडिलांचंच म्हणणें त्याला सर्वथा पसंत पडलें. अशा रीतीनें लग्नाला त्याचें मन तयार झाल्या- वर आपल्या मित्रमंडळीस त्याने स्वतःच आमंत्रणपत्रिका पाठवून त्यांना रामपुरास बोलावून घेतले. त्याचे ते तिघेहि मित्र उमरावतीचेच राहणारे असल्यामुळे ते पत्राप्रमाणें एक दोन दिवसांतच रामपुराला येऊन दाखल झाले. विसूकाका देशमुखांच्या घरांतील एकंदर व्यवस्था, टापटीप व आल्यागेल्यांचा सत्कार पाहून त्या तिघांहि स्नेह्यांना खऱ्या गृहस्थाश्रमाचें दर्शन झाल्याप्रमाणे वाटले व त्यामुळे त्यांचे तेथे मोठ्या आनंदानें दिवस जात होते. दिनकराच्या लग्नाला दोन दिवस राहिल्यावर विसूकाकांनों गांवांतील विशेष ओळखीच्या अशा पांचपन्नास गृहस्थांना सहकुटुंब सहपरिवार बरो- बर घेतले आणि ते मांडवगड येथे येऊन दाखल झाले. गोपाळराव भाग- वतांनीं त्यांची सर्व व्यवस्था फार चांगल्या प्रकारें अगोदरच करून ठेवली होती. जुन्या पद्धतीप्रमाणे सर्व लग्नसोहाळे योग्य प्रकारें होऊन हा विवाह समारंभ मोठ्या थाटाने पार पडला. तंटाभांडण वगैरे कांहीं एक झाले नाहीं. इतक्या थाटानें व आनंदाने पार पडलेला असा विवाहसमारंभ हा मांडवगडला पहिलाच होय, असें तेथल्या लोकांना वाटल्यावांचून राहिले नाहीं. या सर्वाचें कारण विसूकाकांची विलक्षण दक्षता हैं होय. दिन- करच्या पत्नीचे नांव सर्वोच्या विचाराने लक्ष्मी अर्से ठेवण्यांत आलें. स्वतः दिनकरला हैं नांव कितपत आवडले असेल तें असो; पण स्वतः अन्नपूर्णा- काकुंनीं ' आज आमच्या घरांत ही लक्ष्मीच येत आहे' असे म्हटल्यावर त्यालाहि तें नांव आवडून घ्यावे लागलें. इंदिरा, सरोजिनी किंवा असेंच
पान:सुखाचा शोध.pdf/२७
Appearance