सुखाचा शोध. वर्ण, सुबक बांधा आणि रेखलेले अवयव हीं पाहून दिनकर कांहींसा मुग्ध झाला होता, असें ह्मणावयास कांहीं हरकत नाहीं. घरांतल्या बायकांनीं तर या संधीचा चांगलाच फायदा घेतला. कोणीं तिच्याकडून गाण ह्मणून घेतलीं, कोणीं तिला चटण्याकोशींबिरी करण्यास सांगितल्या आणि अन्नपूर्णाबाईंनी तर तिला युक्तीनें पंक्तींत वाढावयाला देखील पाठविलें. या परीक्षणामुळे मुलगी अर्थातच सर्वांना पसंत पडली होती; पण दिन- करची अवस्था मात्र वेड्यासारखी झाली होती. मुलगी सुंदर असून गृहकृत्यांत दक्ष आहे, हे त्यानें स्वतःच पाहिलें होतें; पण एवढ्यानें त्याचें समाधान होण्यासारखे नव्हतें, आपल्या भावी पत्नीचें मन किती सखोल आहे, तिचे विचार किती उदात्त आहेत, तिची बुद्धिमत्ता किती दांडगी आहे, ज्ञान संपादनाची तिला कितपत हौस आहे आणि ललितकलांची तिला कितीशी गोडी आहे, हे त्याला कळावयाला पाहिजे होतें; पण तें न कळल्यामुळे त्याचा निश्चय असा कांहींच झाला नव्हता. केवळ मुग्धा- वस्थेमुळे एकेक दिवस गमावणें म्हणजे जाणूनबुजून आपत्ति ओढून घेणें होय, असे वाटून वरील गोष्टीस तीन चार दिवस झाल्यावर अन्नपूर्णा- काकूची त्यानें गांठ घेतली आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी काढून त्यानें आपले ' उदात्त ' विचार तिला कळविले. दिनकरचें हें अज्ञान पाहून काकूला त्याची दया आली; पण तिनें त्याच्याजवळ कांहीं न सांगतां चिरंजिवाचा मनोदय विसूकाकांना कळविला. विसूकाकांना दिनकरच्या या विचारांचा राग न येतां उलट हंसूंच आलें. ते दिनकरला बोलावून म्हणाले, “ दिनकर, घरांतल्या आम्हां सर्वांच्या मतें तुला योग्य अशी मुलगी आम्हीं पसंत केली आहे. आतां तुझ्या दृष्टीनें तिला कांहीं कांहीं गोष्टी येत नाहीं म्हणतोस, त्या तूं तिला शिकव म्हणजे झाले. आम्ही उत्कृष्ट प्रकारचें सुवर्ण तुझ्या स्वाधीन करणार आहों. त्याचा तूं तुला आवडेल तसा अलंकार तयार कर म्हणजे झालें. एकादा आइता तयार केलेला अलंकार मोठा मनोहर दिसतो; पण अशा वेळीं हिणकस सोनें पदरांत पडण्याचा फार संभव असतो. तुझा काय विचार आहे, तें मला आतांच सांग, म्हणजे त्या गृहस्थास तोंडघशीं पाडल्याचें पातक तरी मला
पान:सुखाचा शोध.pdf/२६
Appearance