Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें. २५. वटाघाटीस निघाली, पोस्टाच्या शिपायानें एके दिवशीं कांहीं पत्रे विसूकाकांच्या हातीं दिल्यावर ते तीं पत्र पहात असतां त्यांनी दिवाकराला आंत पाठवून अन्नपूर्णाबाईंना बाहेर बोलावून आणले, ते म्हणाले, " अन्नपूर्णा, गोपाळराव भागवत आपल्या सर्व मंडळींना बरोबर घेऊन उमरावतीस लग्नाला गेले होते. ते लग्न आटोपून उद्यां आपल्या येथें सगळ्या मंडळीसह येणार आहेत आणि येथें एक दिवस मुक्काम करून मग मांडवगडाला जाणार आहेत. घरांत कांहीं कमजास्त आहे नाहीं तें पहा. त्यांच्या पंक्तीला गांवांतील चार गृहस्थांना जेवावयालाहि बोलावतों. मुलगी त्यांच्याबरोबरच आहे. ती युक्तीनें दिनकरच्या दृष्टीस पडेल अशी मुलींकडून कांहीं तजवीज कर. हो, नाहीं तर मुलगी मला पसंत नव्हती, असे तसें कांहीं म्हणावयाला नको. ज्याची वस्तु त्यानें पाहिलेली बरी. 39 66 असें ह्मणून विसूकाका हंसूं लागले. अन्नपूर्णाबाईनाहि हंसूं आलें, त्या ह्मणाल्या, मुलगी नक्षत्रासारखी आहे, ती त्याला नापसंत पडावयाला काय झाले ? आणि नावडणाऱ्या मुली देखील पुढे आपोआप आवडतात. आपल्या घराण्यांत कोणाचींच लग्झें इतक्या कसोशीनें झालीं नाहींत, असें असून कोणाचाच संसार बिघडला नाहीं. मग दिनकरच्याबद्दल एवढी चवकशी कां ? " विसूकाका ह्मणाले, " वैनी, आमच्या वेळचा कालमान आतां राहिला नाहीं. आतांच्या तरुण मंडळींना काय वाटतें आणि काय नाहीं, तें कोणीं सांगावें ? 29 अन्नपूर्णाबाई यावर अधिक कांहीं न बोलतां घरांत गेल्या आणि विसू- काकाहि दुसऱ्या उद्योगास लागले. दुसऱ्या दिवशीं पत्राप्रमाणें गोपाळराव भागवत मंडळीसह विसूकाकांच्या घरी येऊन दाखल झाले. या मंडळींत लग्नाची मुलगीहि होती. गोपाळरावांचा येण्याचा हेतु वास्तविक अगदी निराळा होता. त्यांच्या सौभाग्यवतीच्या मनांतून जांबईबुवांना पहावयाचें होतें व त्याप्रमाणें तिला जांबई पसंतहि पडला. या संधीचा फायदा दिन- करनेंहि घेऊन आपल्या भावी पत्नीचें दर्शन त्यानें घेतलें. मुलीचा गौर सु० शो०... २