पान:सुखाचा शोध.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९८ सुखाचा शोध. खोली मला स्वर्गसुखापेक्षांहि अधिक आहे. येथून तूं मला नेऊं नकोस.' मलाहि ती हेंच सांगे. भावोजी, डॉत्तर आणि वैद्य यांनी थोडे का प्रयत्न केले; पण तिनें जणूं मरणाचा हट्टच घेतला होता. ' मी त्यांच्या सुखाच्या मार्गात कंटक होऊन कशाला राहूं' असें. ती माझ्याजवळ नेहमीं ह्मणावयाची.” हे उमाचे शब्द ऐकून मर्मस्थानावर जणूं कोणीं घणाचे आघात करीत आहे, असें दिनकरला वाटलें. त्याच्या अंतःकरणाला या वेळीं दुःखाच्या ज्या वेदना होऊं लागल्या, त्याची कोणास कल्पनाहि होणार नाहीं. उमाचें बोलणे सुरूच होतें. ती लणाली, " भावोजी, तुझाला ती देवाप्रमाणे पूज्य आणि पवित्र मानीत होती. तुमच्यावर तिचें जें प्रेम होतें, ते पाहून पाषाणास देखील पाझर फुटावयाचा. तुम्ही विलायतेस गेल्यावर तुमच्या फोटोची ती दररोज पूजा करीत होती. ती आंथरुणावर पडेपर्यंत ही गोष्ट घरांत आम्हां कोणाला माहीत देखील झाली नाहीं. जेव्हां तिला अगदींच शक्ति राहिली नाहीं, तेव्हां ती कामगिरी तिने मला सांगितली. तिची ही पतिभक्ति पाहून आम्हा सगळ्यांची अंतःकरणें तिच्याविषयीं गहिवरून आली. प्राण जाण्याची जेव्हां वेळ आली, तेव्हां तो फोटो तिनें आपल्या हृदयावर ठेवला आणि तो दोन्ही हातांनी आवळून धरून तुमचें कुशल चिंतीत चिंतीत तिनें प्राण सोडला. " आतां दिनकरला मुळींच राहवेना. तो मोठ्यानें आक्रंदून म्हणाला, “ बैनी, पुरे, आतां मला ऐकवत नाहीं. हा ! निर्दय दिनकरा ! त्या साध्वीच्या मृत्यूला तूंच सर्वस्वी कारण झालास ! " असें ह्मणून दिनकरनें धाडकन् पलंगावर आंग टाकून दिलें. इतक्यांत त्याला कसली आठवण होऊन त्यानें डाव्या हाताच्या भिंतीकडे पाहिले. लक्ष्मीचा एक लहानसा फोटो त्या भिंतीवर लटकत होता. तो त्यानें चटकन् काढून घेतला आणि तो वक्षस्थळावर धरून लहान मुलाप्रमाणे रडूं लागला. उमा ह्मणाली, “ भावोजी, तिची शेवटची इच्छा तुझांला सांगतें. 'त्यांना ह्मणावे मालतीबरोबर विवाह करून सुखानें रहा !" भावोजी, हे तिचे शब्द ऐकून आमची अंतःकरणें पिळवटून निघालीं. " 64 दिनकर रडत रडत ह्मणाला, वैनी, पुरे. आतां मला कांहीं सांगू