पान:सुखाचा शोध.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सोळावें. असें ह्मणून उमा पुढे चालू लागली. दिनकर तिच्यामागें जाऊं लागला. दोघांच्याहि डोळ्यांतून अनू पडत होते आणि दुःखानें अंतःकरणें भरून आलीं होतीं. दारासमोरच्या तुळशीवृंदावनाकडे बोट करून उमा ह्मणाली, " भावोजी, या वृंदावनाजवळ लक्ष्मीनें प्राण सोडला. प्राण जाण्याच्या वेळेला आपणांस तुळशीवृंदावनाजवळ ठेवा, असे तिनेच सांगितलें होतें. त्या माउलीचें प्राणोत्क्रमण तरी किती शांतपणे झ.लें. एवढी आजारी होती; पण कोणाला कसली सेवा ह्मणून करूं दिली नाहीं. " असें ह्मणतां हाणतांच उमाला रडें आवरेनासें होऊन ती मोठ्याने रडूं लागली. निश्चल दृष्टीने कांही वेळ त्या भूमीकडे दिनकर पहात होता. नंतर त्याला काय वाटले कोण जाणें, तो त्या भूमीवर गडवडां लोळू लागला. उमा ह्मणाली, भावोजी, असे काय करतां ? " स्फुंदत स्फुंदत दिनकर ह्मणाला, " या पुण्यभूमीवर लोळून मला माझ्या पापाचा भार कमी करूं दे. हें सतीस्थान, हेच माझें आतां पुण्यक्षेत्र. मला येथें तिची क्षमा माणूं दे. मला तिच्यापुढे पदर पसरूं दे. वैनी, ती देवता आणि मी-पापेक्षांहि नीच. ती मला क्षमा करील ना ? माझ्या पासून सुखाची आशा करणाऱ्या त्या साध्वीशीं मी कधीं धड बोललों- देखील नाहीं. वैनी, अनुतापानें अंतःकरणात जी आग पेटली आहे, ती आतां कशानें शमत्रं ? " दिनकरचे हे शब्द ऐकून उमाचें हृदय अधिकच कळवळून आले. ती ह्मणाली, "भावोजी, नका आतां असा शोक करूं. झालें तें झाले. आतां कितीहि रडलां, तरी लक्ष्मी थोडीच परत यावयाची आहे. चला, माझ्यामागें आतां लक्ष्मीच्या खोलीत या. अजून पुष्कळ सांगावयाचे आहे. " " 66 दिनकर तुळशीवृंदावनाजवळून उठला आणि उमाच्या मागें खोलींत गेला. खोलीतल्या पलंगाकडे बोट करून उमा ह्मणाली, भावोजी, ऋतुशांतीच्या वेळीं लक्ष्मीच्या बापाने दिलेला हा पलंग. याच पलंगावर लक्ष्मी तुमचा ध्यास घेऊन तळमळत होती तिची आई जेव्हां तिला माहेरीं नेण्यासाठी आली, तेव्हा ती ह्मणाली, 'आई, ही खोली सोडून मी आतां कुठे येणार नाहीं. त्यांच्यासह जेथे आनंदाने काळ काढला, ती