पान:सुखाचा शोध.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सोळावें. १९९ नकोस. मी येथेंच निजतों तूं खोलीचें दार लावून घेऊन बाहेर जा. मला आतां मनसोक्त रडूं दे. " उमानें त्याप्रमाणें दार लावून घेतले आणि ती घरांत गेली. इकडे दिनकर रात्रभर अश्रु गाळीत होता. लक्ष्मीची योग्यता केवढी मोठी होती, हें आज त्याच्या चांगले लक्षांत आले होतें. विशेषतः तिच्या मृत्यूला आपण कारणीभूत आहों, हा विचार जेव्हां जेव्हां दिनकरच्या अंतःकरणांत उत्पन्न होई, त्या त्या वेळी त्याच्या हृदयाला ज्या वेदना होत, त्याची कोणाला कल्पनाहि करता येणार नाहीं. हळु हळु एकेक दिवस जात होता; पण त्यामुळे दिनकरच्या चित्तावर झालेला आघात कमी न होतां तें दुःख अधिकाधिक वाढू लागले होते आणि त्याच्या मुखावर जी विपादाची छाया पसरली होती, तीहि तशीच कायम होती. दिनकर घरी आल्यावर नौक- रीच्या गांवावरून येऊन भास्करनेंहि त्याची पुष्कळ समजूत केली. दिवा- करची वकिलीची परीक्षा पास होऊन तो अकोल्याला वकिली करीत होता. तोहि घरीं येऊन गेला. गांवांतल्या चार वृद्ध गृहस्थांनींहि दिनकरला पुष्कळ सांगितले; परंतु दिनकरच्या मुखावर पसरलेली विषादाची छाया कमी होत आहे, असे मात्र कोणाच्याहि दृष्टोत्पत्तीस आले नाहीं. भास्करला शंभर रुपये पगार असून तीन चारशें रुपये दिवाकरलाहि मिळत होते. शिवाय कुटुंबाचा एकोपाहि अद्यापि कायम होता. अशा स्थितींत डॉ. दिनकर विश्वंभर देशमुख एम, ए. पी, एच, डी. आय, सी, एस. यांची नेमणूक मध्यप्रांतांत एका जिह्याचे ठिकाण आसिस्टंट सेशनजजाच्या जागेवर झाल्याचें जेव्हां सरकारी ग्याझेटांत प्रसिद्ध झालें; तेव्हां सर्वांनीच दुःखांत सुख मानून घेतलें. परंतु स्वतः दिनकरच्या मनावर या नेमणुकीनेंहि कांहीं परिणाम झाला नाहीं. त्याच्या अंतःकरणांतल्या खोल मर्मस्थानाला ज्या दुःसह वेदना होत होत्या, त्या वेदना नाहींशा करण्यासाठी कोणत्या उपा याचें अवलंबन केले पाहिजे, इकडे दिनकरचें सगळे लक्ष लागले होतें. ऐहिक सुखाच्या मागे पळत असतां त्याला ज्या लहान मोठ्या ठेंचा लागल्या होत्या, त्यावरून हें ऐहिक सुख किती फोल आहे, याचा दिनकरला प्रत्यक्षच अनुभव आल्यामुळे खरें सुख कोणते आणि खोटें सुख कोणतें,