पान:सुखाचा शोध.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९६ सुखाचा शोध. उच्चारतांच उमानें एकदम टाहो फोडला. " भावोजी, आपल्या गृहांतली गृहदेवता गेली. तुमची वाट पाहून पाहून विचारीनें प्राण सोडला. " उमाचा हा आर्तनाद ऐकून दिनकरहि मोठ्याने रडूं लागला. या रडण्याने घरांत सगळ्यांच्या छातीत धस्स झाले आणि सगळ्याजणी बाहेर आल्या. भास्कर आणि दिवाकर हे दोघेहि बाहेर गांवींच होते. दिनकरला पाहतांच त्याच्या आईनें त्याला कडकडून मिठी मारली आणि ती मो. ठ्यानें रडूं लागली. "दिनकर, माझ्याजवळ ठेवायला दिलेली ठेव मी गमा. वली, मी आतां तुझी वस्तु तुला कोठून देऊं ? पहा ! हें घर पहा ! सगळ्या घराची शोभा गेली. देवाने आह्मांला खरी खरी लक्ष्मी दिली होती; पण आमच्या कर्माने ती आमच्याजवळून नेली ! ” दिनकरची स्थिति या वेळीं कल्पनेच्या बाहेर करुणाजनक झाली होती. विसुकाकांच्या घरांत एकाएकी रडारड सुरू झाल्याचे पाहून शेजारचे लोक साहजिक घावरून धांवत आले; पण दिनकरला पाहतांच त्यांना या रड- ण्याचें कारण समजलें. विशेष परिचित अशा गृहस्थांनीं दिनकरला सहानु- भूति दर्शवून हातीं धरलें आणि आंत ओसरीवर आणून बसविलें, दिन- करने पहिल्यानेच जो टाहो फोडला तेवढाच. मग त्याला रडूं येईनासें झाले आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रूहि पडेनातसे झाले. हळू हळू घरांतला हा रडण्याचा ओघ बराच थांबला. आलेल्या गृहस्थांनी दिनकरला व त्याच्या आईला चार सांतवनाच्या गोष्टी सांगून व थोडा वेळ दिनकर जवळ बसून ते निघून गेले. दिनकरच्या आईनें त्याला आंघोळ घालून मोकळा करून घेतले आणि दोन घास खाण्याविषयींहि त्याला आग्रह केला. आईच्या आग्रहा- स्तव दिनकरनें पानावर बसल्यासारखे केले आणि पुन्हां तो ओसरीवर येऊन बसला. थोड्या वेळानें उमावैनीहि तेथें आली. उमावैनीला पाह- तांच दिनकरचा कंठ भरून आला. तो झणाला, " वैनी ? " उमाचेंहि हृदय. भडभडून आलें. ती ह्मणाली, "काय भावोजी?” डोळ्यांतून अश्रूच्या धारा वहात असतां दिनकर ह्मणाला, " तिनें कोणत्या जागेवर देहत्याग केला ? " आंतून दिवा लावून आणून उमा ह्मणाली, 66 माझ्यामागें था. था, ""