पान:सुखाचा शोध.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पंधरावें. १९९ " " नाहीं अजून. त्यांना काय लिहावें, हेच आमच्या इकडे सुचेनासें झाले आहे. मालतीबाई, तुझांला त्या दिनकररांवाची माहिती नाहीं. किती थोर आणि उदार अंतःकरणाचा गृहस्थ, पण भलताच नाद डोक्यांत घेऊन सगळ्या आयुष्याची माती केली. आमच्या इकडे त्यांच्यासाठीं फार वाईट वाटतें. डोळ्यांतून पाणी देखील काढावयाचें होतें. मला देखील त्यांच्यांसाठी फार वाईट वाटतें, पण काय करणार ?' 'तुझांला दिनकरावांची माहिती नाहीं, हे चंद्रभागाचे शब्द ऐकून तशा तापदायक मनः स्थितींतहि मालतीला हंसूं आलें. तें हंसूं तसेच दाबून मालती, ह्मणाली, “ त्यांचा आणि तुमच्या इकडच्यांचा जर इतका स्नेह असेल, तर त्यांना चांगले सणसणीत पत्र पाठवून उत्साहित कां करीत नाहीं ? तत्वज्ञानाची परीक्षा नापास झाली, तर झाली. सिव्हिलसर्व्हिसची किंवा ब्यारिस्टरची परीक्षा देऊन ते कां येत नाहींत? एवीतेवी ते विलायतेस गेले आहेतच. मग त्यांनी रिकाम्या हातानें कां परत यायें ? 3 मालतीची ही सल्ला चंद्रभागाला फारच आवडली. ती ह्मणाली, "थांबा मालतीबाई, त्यांनी आजच पत्राचा मसुदा तयार करून ठेवला होता वाटते. पाहूया त्यांत त्यांनी काय लिहिले आहे तें. " असे ह्मणून चंद्रभागा बाहेर गेली आणि पांडुरंगानें पेनसिलीने एक पत्र खरडून ठेवले होते, तें घेऊन आली. पांडुरंगानें घाईघाईने हा मसुदा तयार केला होता; पण त्याचें अक्षर चंद्रभागाच्या परिचयाचें असल्यामुळे तिने ते मालतीला चांगल्या रीतीनें वाचून दाखविलें. उमराती. ता. - मित्रोत्तम दिनकरराव यांस, सा. न. वि. वि. आपले पत्र मिळाले. पाहून फार खेद झाला. तत्त्वज्ञानाच्या परिक्षेत आपण पास झाला असता, तर मला आणि आपल्या सर्व मित्र मंडळीस फार आनंद झाला असता. परंतु मानसिक प्रेमाचें खूळ आपल्या डोक्यांत शिरल्यामुळे सगळ्यांची निराशा झाली. तत्त्वज्ञानाची परीक्षा पास झाल्याने आपणांस मोठ्या हुद्याची नौकरी मिळाली असती, असें कांहीं नाहीं; परंतु त्यामुळे