सुखाचा शोध. लागेनासे झाले आणि मनाला कशानें ह्मणून समाधान वाटेनास झाले. माझ्या मनाच्या दुर्बळ स्थितीबद्दल आपण मला दोप द्याल, पण मी तरी काय करूं ! माझें मन इतकें दुर्बळ आहे-आतां होतें असे म्हटले पाहिजे- हें मी कबूल करतों. माझें मन दुर्गळ खरेंच; परंतु इन्टेलेक्चुअल प्रेमाला मर्यादा आहे, हे त्यामुळे मला दिसून आल्यानें माझें मन पुन्हां खंबीर होऊं लागले आहे. थोड्या दिव- सांपूर्वी दिवाकराकडून घरचें पत्र आले होते; परंतु त्यानें घरची कांहीं सगळी हकीकत मला कळविली नाहीं. मातोश्री अजारी असून माझ्या वाटेकडे त्यांचे डोळे लागले आहेत, असे त्यानें पत्रांत लिहिले आहे. माझ्या या निष्ठुर वर्तनाचीं फळें कोणा कोणाला चाखावी लागणार आहेत, तें परमेश्वरास माहीत. आपण एकदां घरची सगळी हकीकत कळविल्यास फार उपकार होतील. आपला, नम्र मित्र- दिनकर, मालतीनें हैं पत्र कसे बसें वाचलें खरें, पण तें वाचून होतांच माल-- तीच्या मुखावर विलक्षण काळिमा पसरून तिच्या हाताला कंप सुटला आणि पत्र तिच्या हातांतून गळून पडलें. हे पाहून चंद्रभागा अर्थातच घाबरून ह्मणाली, " मालतीबाई, तुम्ही असे काय करता ? " या प्रश्नानें मालती जणूं शुद्धीवर आली. ती ह्मणाली, “थोड्या दिवसां पूर्वी मी फार अजारी होर्ते, तेव्हां पासून केव्हां केव्हां मला असें होतें. जातें मी आतां-थोडा वेळ स्वस्थ पडले, ह्मणजे बरे वाटतें.” असें ह्मणून मालती आपल्या विन्हाडीं गेली. घरी येऊन ती अंथरुणावर खरोखरच निजली आणि अश्रू ढाळू लागली. दिनकरनें आपल्यासाठी केवढा स्वार्थ- त्याग केला, किती कष्ट सोसले आणि स्वतःचा कसा मानभंग करून घेतला, हें आज त्या पत्रानें मालतीच्या चांगले लक्षांत आल्यामुळे तिचें अंतःकरण दिनकरपियों तिळ तिळ तुटूं लागतें. चार सहा दिवस गेल्यावर मालती पुन्हां चंद्रभागाकडे गेली आणि सहज बोलतां बोलतां ह्मणाली, " चंद्रभागाबाई, तुमच्या त्या विलायतच्या स्नेह्यांना पत्रोत्तर पाठविले की काहीँ ?" ?
पान:सुखाचा शोध.pdf/१९०
Appearance