पान:सुखाचा शोध.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९२ सुखाचा शोध. आपला सन्मान अधिक झाला असता. सिव्हिलसहिची परीक्षा पुष्कळ देतात, ब्यारिस्टरहि पुष्कळ होतात; पण आतां या दोहों- येकीं एकादी परीक्षा देऊन मग स्वदेशीं यावें, अशी आह्मा सर्वांची इच्छा आहे. आतां पुन्हा आपण प्रेमविज्ञान शास्त्राचा सूक्ष्मा- सूक्ष्म विचार करण्याच्या भानगडीत पडूं नये अशी माझी व आपल्या सर्व आतस्वकीयांची आपणास विनंति आहे. त्या रामपुरांत आपल्या घरांत मंद प्रकाश देणारी प्रेम जोत लुकलुक करीत आहे, हे आपण त्या बिलास नगरींत विसरूं नये. खेड्यांतल्या गृहदेवतेच्या दिव्यांतलें तेल संपलें नाहीं, तोंच आपले येणे व्हावे, अशी सगळ्यांची इच्छा आहे. आपल्या मातोश्रीची प्रकृति बरी आहे. मी व आपली वैनी आणि मुलेबाळें सुखरूप आहोत. पत्रोत्तर लवकर पाठवावें ही विनंति या आपला नम्र मित्र पांडुरंग हैं पत्र वाचून होतांच मालती ह्मणाली, " मी ह्मणत होतें, तेंच या पत्रांत लिहिले आहे. या पत्राचें काय उत्तर येतें तेंहि मला दाखवा हो ! " असे ह्मणून मालती थोड्या वेळाने आपल्या घरी गेली. हें पत्र पांडुरंगानें नीट लिहून पाठविले त्यावेळी दिनकरची स्त्री लक्ष्मी बरीच आजारी होती आणि ह्मणून दिनकरच्या लक्षांत न येईल, अशा रीतीनें ती गोष्ट त्यानें पत्रांत नमूद केली होती. मालतीला हा सगळा पत्रव्यवहार पाहण्याची किती उत्कंठा होती, हैं निराळे सांगावयाला नको. तिची आणि चंद्रभागा- ची चांगली ओळख झाल्यामुळे हीं सर्व पत्रे तिला पहावयाला मिळत होतीं. थोड्याच दिवसांनी दिनकरकडून वरील पत्राचे उत्तर आले आणि तें मालतीला पहावयालाहि मिळालें. लंडन ब्रन्सविकस्ट्रीट ता- मित्रोत्तम पांडुरंगराव यांस, कृ. सा न. वि. वि. आपले कृपापत्र मिळाले. पत्रोत्तर पाठ- विण्यास पुष्कळ विळंब झाला, याबद्दल क्षमा असावी. आपले उत्साहपूर्ण पत्र वाचून मला खरोखरच फार आनंद झाला. मित्रप्रे-