Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखाचा शोध. केवळ मदनाच्या पुतळ्यासाठींच वरमाळ तयार करणें या दोन्ही गोष्टीहि अव्यवहार्य होत. याच दृष्टीनें विद्या व संगितादि ललित कलांविषायहि परस्परांचे विचार केवळ काव्यमय किंवा स्पप्नसृष्टीतले असूनहि भागावयाचें नाहीं. स्वप्नसृष्टि आणि व्यवहार यांत जमीन अस्मानाचें अंतर आहे आणि ह्मणूनच केवळ सुखाच्या काव्यमय कल्पनेत दंग होणें हाणजे व्यवहार सोडणें होय. व्यवहार ह्मणजेच समाजाची संस्कृति विवाह हे समाजाच्या संस्कृतीसाठीं न होतां ते जर केवळ काव्यमय सुखाच्या कल्पनेनें होऊं लागले, तर विवाहांतला सत्वांश निघून जाऊन बाकूस मात्र हाती लागेल आणि अशा अत्यंत निकृष्ट ऐहिक सुखाच्या बाकुसापासून कोणताहि समाज उन्नतीस पोहोचणार नाहीं. निरनिराळ्या राष्ट्रांचे इतिहास हेच शिकवीत आहेत, पण स्वभावतःच मोहासक्त मनुष्य इतक्या ठेचा खात असूनहि पुन्हां त्याच मार्गानें सुखाचा शोध करतांना आढळून येतो. दिनकर चिकित्सक बुद्धीचा नव्हता असें कांहीं नाहीं; तथापि त्याची सुखा- ची कल्पना बरीच दृढ झाली होती. आपल्या भावी पत्नीचें चित्र त्यानें आप- ल्या मनोभूमीवर रंगवून ठेवलें होतें. पतीबरोबर विनयानें वागून स्वभाव- तःच लाजणारी मुरडणारी पत्नी त्याला नको होती, तर पुरुषां इतक्याच धीटपणे समाजांत वावरणारी पत्नी त्याला पाहिजे होती. अंगावर गोठ- पाटल्या घालून देवालयाच्या भोवताली प्रदिक्षणा घालणारी लक्ष्मी त्याला नको होती, तर पायांत बूट घालून पतीबरोबर सहल करणारी मेनका त्याला पाहिजे होती. ताकाच्या भांड्यांत रवी घुसळून ते कर्णकटू सूर काढणारी गृहकृत्यांत दक्ष अशी स्त्री त्याला नको होती, तर दिवाणखान्यांत खुर्चीवर बसून 'हमनियम' चे गोड स्वर काढणारी ललिता त्याला पाहिजे होती. ‘इकडे प्रकृतीला जपत जावें, ' हें पत्रांत विनयानें लिहिणारी लज्जावती त्याला नको होती, तर ' प्रियकराची तब्यत वरी आहे ना ? ' असे विचारणारी विदुषी त्याला पाहिजे होती. पतीचें दर्शन होतांच गालांतल्या गालांत हंसून सरकन माजघरांत जाणारी भित्री पोर त्याला नको होती, तर पतीचें घरांत पाऊल पडतांच त्याच्याशीं हस्तांदोलन करण्यासाठीं धांवणारी धैर्यशालिनी त्याला पाहिजे होती. दिनकर अशा विचारांत दंग