Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पहिलें. हळू हळू सगळे विद्यार्थी पानांवरून उठून आपापल्या खोलीत जाऊन अभ्यासाच्या वगैरे उद्योगास लागले. दिनकरचें मन मात्र थोडेसें अस्वस्थ झाल्यामुळे तो अभ्यास न करतां एका खुर्चीवर सचिंत बसला होता. रामभाऊ, विश्वनाथ व पांडुरंग हे तीन विद्यार्थी त्याचे विशेष स्नेही असून ते त्याच्या गांवाकडचेच राहणारे होते. दिनकराच्या वडिलांनी पाठविलेले पत्र आतां दिनकराच्या हाती असून त्यासंबंधानेंच तो विचार करीत होता. तो बी. ए. चा अभ्यास करण्यासाठी जेव्हां मुंबईला आला,

  • तेव्हांपासून त्याच्या विचारांत बराच पालट होऊन समाजसुधारणेकडे तो
  • वरेंच लक्ष पुरवीत असे. हळू हळू केवळ सुधारकांच्या भाषणां वगैरेवरून

विवाहाच्या बाबतीत त्याची कांहीं मते दृढ झाली होती. आपला विवाह एका प्रौढ व सुंदर मुलीबरोबर व्हावा, तिला चांगले लिहितां वाचतां येत असावें, बाजाची पेटी वाजवितां यावी, थोडेसें गातांहि यावें, आपल्या समवेत तिनें बाहेर हिंडावयास यावें. वगैरे गोष्टींनीं अलंकृत अशी आपली भावी पत्नी असावी, असे दिनकरला वाटत असे. दिनकरला असे वाटत होतें, याबद्दल त्याला विशेष नांवें ठेवण्यांत 'कांही अर्थ नाहीं. समाजसंस्कृतीविषयीं खोल व दूरवर दृष्टि न पोहोंचवितां जे विचार करतात, त्या सर्व तरुणांना व हौशी गृहस्थांना असेच वाटत असतें. असें वाटण्याचें कारण त्यांच्या अंतःकरणांत एक विलक्षण इच्छा उत्पन्न झालेली असते, हे होय. ही त्यांची इच्छा म्हणजे सुखाचा शोध' ही होय. ऐहिक सौख्यासाठी स्त्रीची जोड सर्वथा योग्य अशी मिळावी, असे प्रत्येकास वाटत असते; परंतु त्यासाठी समाज- 'सुधारक तरूण नशिबावर हवाला ठेवण्यास कबूल नसून प्रयत्नानें हें सुख मिळविले पाहिजे, असा त्यांचा अट्टाहास आहे. आपल्या पसंतीप्रमाणे स्त्री मिळवूनहि जर यांच्या संसाराचे नऊतेरा निपावणेबारा झाले, तर मात्र हे नशिबावर हात ठेवण्यास कबूल होतात. आपणास प्रति स्वर्गसुख मिळावें, ही इच्छा प्रत्येकाची असणे स्वाभाविक आहे; पण त्या बरोबर स्वतःच्या योग्यतेचाहि विचार जमेस धरावयाला पाहिजे. प्रत्येक तरुणानें रंभेसारख्या • सुंदर स्त्रीचे पाणीग्रहण करण्याची प्रतिज्ञा करणे आणि प्रत्येक तरुणीनेंहि .6