Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पहिलें. १९ झाला ह्मणजे तो स्वतःशींच ह्मणे, 'माझी ही एवढी इच्छा पूर्ण झाली, तर स्वर्गमुखहि मी तुच्छ मानीन !' पण- एका लहानशा कागदाच्या चिठोन्यावर त्याच्या बापानें अवघ्या चार दोन ओळीच लिहिल्या होत्या; पण तेवढ्यानें त्याच्या अंतःकरणांत सागरा- प्रमाणे खळबळ उडाली होती. 'माझें लभ करण्याचा माझ्या बापाला काय अधिकार ? मी वाटल्यास लग्न करीन अथवा असाच राहीन. बापाने पसत केलेल्या मुलीबरोबर मी जन्म कंठावयाचा ह्मणजे ती एक शिक्षाच होय. गोपाळराव भागवत ह्मणजे कुलीन व घरंदाज घरण्यापैकी एक बड़े गृहस्थ, हे मला माहीत आहे; पण मुलगी कुलीन असली झणजे बाकीचे सगळे गुण तिच्या आंगीं असतातच, असें कांहीं नाहीं. 'मुलगी सुस्वरूप आहे ' असें आमचे वडील ह्मणतात; पण नाकडोळे साधारण बरे असले, झणजे त्या मुलीला सुस्वरूप ह्मणण्याचा प्रघातच आहे ! खरें सौंदर्य ह्मणजे काय, हें तरी या मंडळींना कोठें समजतें आहे ? पुष्कळ स्त्रिया सुंदर असूनहि योग्य अभिनयाच्या ( एटिकेट) अभावामुळे त्या सुंदर आहेत, असे समजून देखील येत नाहीं. छे:! बाबांनी मला खरो- खर मोठ्या संकटांत टाकले. कॉलेजांत शिकणाऱ्या एकाद्या मुलीशी विवाह करून खरें वैवाहिक सुख मिळविण्याचा माझा निश्चय त्यांना कसेंहि करून कळविलाच पाहिजे. ' अशा प्रकारचे अनेक विचार दिनकरच्या चित्तांत. त्या पत्रानें घोळू लागले. दिनकरच्या एकंदर स्वभाव वैचिन्यांतील ही वैवाहिक सुखाची काव्य- मय कल्पना सोडून दिली, तर बाकीच्या दृष्टीनें, तो मोठा बाणेदार व उदार प्रकृतीचा होता, असेंच कोणाला ह्मणावें लागेल. त्याची बुद्धि तीक्ष्ण असून वाचनहि दांडगें होतें. मातृभूमीबद्दल त्याला विलक्षण अभिमान होता व तिच्या कल्याणासाठीं तो वाटेल ते कष्ट सोसण्यास तयार होता.. स्वदेश व स्वदेशबांधव यांविषयीं तो बोलू लागला म्हणजे त्याचें हृदय गहिंबरून येत असे. त्याचें त्याच्या कुटुंबांतील मंडळीवर विलक्षण प्रेम होतें व आईबापांविषयीं त्याच्या मनांत पूज्यभावहि दांडगा होता. दिनक- रचा हा असा विसंगत स्वभाव असल्यामुळे वडिलांच्या पत्राचा त्याच्यावर