पान:सुखाचा शोध.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७२ सुखाचा शोध. 66 'लागले आणि व्यवहारापासून अगदींच अलिप्त असलेली मालती त्यामुळे भयाकुल व शोकाकुल झाली. स्वतःच्या नांवावर ब्यांकेत पैसे आहेत, हे तिला माहीत होतें; परंतु पैसा हें कांहीं खरें आश्रयस्थान नव्हे, हैं तिच्या लक्षांत आल्यावांचून राहिले नाहीं. आपल्यासारख्या तरुण मुलीने एकाकी राहणे, हेंच तिला मोठें कठिण वाटू लागले. या काळजीनें मालती किती त्रस्त झाली असेल, याची कल्पनाच केली पाहिजे. ती अशा दुःखांत असतां तिच्या सुदैवानें की दुर्दैवानें तें कोणास माहीत; पण तेथें एका- एकी ब्यारिस्टर मुकुंद यांची स्वारी आली. मुकुंदला समोर पाहतांच मालतीला अधिकच रडें कोसळलें आणि इकडे मुकुंदनेंहि डोळ्याला हात रुमाल लावून स्वतःचें अंतःकरण कळवळून आल्याचें दाखविले. तो शोकार्त स्वरानें ह्मणाला, मालती, मी बाहेर गांवीं गेल्यामुळे मला तुझ्या- कडे इतके दिवस येतां आलें नाहीं; याबद्दल मला क्षमा कर ! वामन- रावांची मृत्युवार्ता ऐकल्यापासून मला अगदी चैन पडेनासे झाले आहे. आह्मां सुधारक मंडळीचा एक मोठा आधारस्तंभ आणि मार्गदर्शक गेला.. आह्मां त्रयस्तांना जर इतकें वाईट वाटतें, तर तुझ्यावर तर आकाशच कोसळले आहे. पण याला कोणाचा उपाय आहे ? " असें ह्मणून मुकुं दने आपला शोक प्रदर्शित केला. नंतर त्यानें एकबार मालतीकडे दृष्टि वळविली. मालतीचे अश्रू तिच्या गालांवरून पडतांना पाहून तो मनांत ह्मणाला, या अश्रूंमुळे हिचें सौंदर्य किती तरी अधिक खुलतें.” नंतर तो गंभीर स्वरानें सहानुभूतिपूर्वक ह्मणाला, 64 मालती, तूं सूज्ञ आहेस, तेव्हां असा शोक करणें बरें नव्हे. जगाकडे पाहून आपले दुःख गिळले पाहिजे." मालती आर्त स्वरानें ह्मणाली, " मुकुंद, तुम्ही ह्मणतां तें सगळे खरें;. पण माझ्या दुर्दशेची हकीकत तुझाला जर समजली, तर रडण्याला हा नुकताच मीं कोठें आरंभ केला आहे, असे दिसून येईल. मला आतां प्रत्यहीं असेंच रडावयाचें आहे. रडण्यासाठींच मला देवानें जन्मास घातलें आहे !" 66 " " तूं हे काय म्हणतेस ? मला कांहोंच समजले नाहीं. मालती, सांग; सांग. तूं कोणत्या संकटांत आहेस, हें मला स्पष्टपणे सांग. मी वाटेल तो. प्रयत्न करून तुझी ही दुर्दशा दूर करीन. "