पान:सुखाचा शोध.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण तेरावें. होऊन त्या दोघांचा तिला रागहि आला. ती ह्मणाली, सोयीचें पडेल, तसे तुझी करा. माझ्या संबंधानें तुझांला परमेश्वर मला आतां जो मार्ग दाखवील तो मी पत्करीन. " १७१ तुह्याला जसें काळजी नको. 66 डॉक्तर सहानुभूति दर्शवून म्हणाले, " परमेश्वरावर तुमचा एवढा विश्वास आहे, हे फार चांगलें. तुमचा सांभाळ करावयाला कमळाबाईना कांहीं हरकत नव्हती, पण एक तर त्यांची पैशाची अडचण आणि दुसरें तुझी आतां जाणत्या झाल्यामुळे तुमच्या संगोपनाची आवश्यकताहि नाहीं. तुझांला आतां जें काय करावयाचे असेल, तें मात्र लवकर करा. कारण तीनचार दिवसांत या घरांत भाडेकरी येणार आहे.” " होय. तें मला आतांच समजले आहे. मजवर असा प्रसंग येईल, अशी मला कल्पना नसल्यामुळे पुढील मार्ग शोधण्याचा मी विचारच केला नाहीं. आतां पुढे काय करावयाचें तें मी एकदोन दिवसांतच ठरविते." “ त्यांत एवढी काळजी करण्यासारखे काय आहे ? तुझी एकादी • स्वतंत्र जागा पाहून तींत रहा आणि स्वतःच्या विवाहाच्या उद्योगाला लागा. आपणा सुधारकांतले अनेक तरुण विवाहास योग्य असे आहेत. " मालती किंचित् रागानें ह्मणाली, " ती सल्ला आपण मला द्यावयाला नको. पुढे काय करावयाचें तें माझें मचि ठरवीन.” डॉत्तर म्हणाले, " तुझी अशा रागावतां कां ? मीं कांहीं तुझांला वाईट • सल्ला दिली नाही. तुमच्या वडिलांचा एक मित्र या नात्याने मला जें सांगणे इष्ट वाटले तें मीं तुझाला सांगितलें.” असे ह्मणून डॉत्तर तेथून निघून गेले. कमळाबाईहि सचिंत बसल्या होत्या. आपल्या सावत्र आईला थोडी विनंति करावी, असें मालतीच्या मनांत आलें; पण आईकडून काय जवाब मिळणार, हें मालतीला चांगले माहित असल्यामुळे मालती तशीच • तेथून निघाली आणि आपल्या खोलींत जाऊन अश्रु ढाळीत बसली. घर- दार सर्व कांहीं असून बापाच्या आकस्मिक मृत्युमुळे आज आपणांस बस- ण्यासाठी सत्तेची अशी दोन हात जागाहि कोठें नाहीं, हें जेव्हां तिच्या लक्षात आले, तेव्हां आश्रयहीनतेचें भेसूर चित्र तिच्या डोळ्यापुढे दिसूं