Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७० सुखाचा शोध.. विशेष सलूं लागला. सल्ला मसलतीला पुष्कळ दिवसांच्या परिचयाचे डॉत्तर असल्यामुळे या बाबतींत तिला मोठासा विचार करावा लागला नाहीं. बोलून चालून सवतीची मुलगी आणि त्यांतहि ती आजपर्यंत मना- विरुद्ध वागत आलेली; तेव्हां तिला दूर करणें हैं कमळाबाईला व डॉक्त- रला आपले पहिले कर्तव्य वाटावें यांत कांहीं नवल नाहीं. लोकलजेस्तव दोघांनी एक महिना दम काढला, हेंच त्यांचे मोठें औदार्य. कमळावा- ईनें आतां केलेली प्रस्तावना आणि घरांत या महिन्यांत झालेल्या कुरबुरी यामुळे मालतीच्या डोळ्यापुढे पुढील भेसूर चित्र उभे राहून ती भयाकुल झाली. वामनरावांनी या पूर्वीच जर आपले लग्न करून दिलें असतें, तर फार बरें झालें असतें, असे तिला वाटू लागलें; पण आतां तसे वाटून उपयोग काय ? मी बी. ए. झाल्यावर लग्न करणार आणि तेंहि स्वतःच्या मतानें करणार, असें जें मालतीने ठरविले होते, त्याबद्दल तिला आतां कांहींसा अनुताप होऊं लागला. मालती स्तब्ध उभी आहे, असे पाहून डॉक्कर गंभीरतेनें म्हणाले, " मालतीबाई, असे स्तब्ध राहून कसे चालेल. तुझी मुशिक्षित आहां. कमळावाईपेक्षांहि तुझी समजूतदार आहां; तेव्हां तुझीच आतां कांहीं तरी तोड काढली पाहिजे, " ( असें ह्मणून डॉक्कर मालती काय म्हणते, याची वाट पाहू लागले. • मालती अजूनपर्यंत स्तब्धच उभी होती. डॉक्तर पुन्हा ह्मणाले, माल. तीबाई, कमळाबाईंची काय इच्छा आहे, तें आतां तुझाला कळवितों. दोन्ही मुलांना घेऊन एकाद्या चाळींतल्या खोलीत जाऊन रहावयाचें आणि हा बंगला भाड्याने द्यावयाचा, असे त्यांनी ठरविले आहे. या बंग- ल्याला भाडेकरीहि मिळाला आहे. परवांपासून तो रहावयाला येणार असून त्यानें साठ रुपये भाडे देण्याचें कबूल केले आहे. तेवढ्यांत कमळाबाईचा आणि दोघां मुलांचा कसा तरी निर्वाह होईल. तेव्हां तुझी आपली स्वतंत्र व्यवस्था पाहणें भाग झाले आहे. मला वाटतें तुझी कॉलेज क्वार्टर्समध्यें जाऊन रहावें हैं बरें. व्यांकेंत तुमच्या नांवानें कांहीं पैसे आहेतच. " डॉक्कर आणि कमळाबाई हीं दोघेंहि किती क्षुद्र बुद्धीचीं आहेत, हें आतां मालतीच्या चांगलें लक्षांत आले आणि त्यामुळे ती साहजिक उद्विग्न