प्रकरण तेरावें. पैकीं निद्रादेवीच्या अंकाबर कोण लोळत होतें आणि स्वप्नसृष्टींत कोण वावरत होतें, तें ज्याचे त्याला माहीत. दुसऱ्या दिवशीं सगळ्यांचा निरोप घेऊन दिनकर मुंबईस निघून गेला. तेथें विलायतेस जाण्याची तयारी करण्यासाठीं तो चार आठ दिवस होता; पण त्या अवधीत त्यानें मालतीची गांठ घेण्याचा मुळींच प्रयत्न केला नाहीं. दिनकर विलायतेस जात आहे, हे पाहून त्याच्या शेटजीनेंहि याच वेळी विलायतेस जाण्याचे ठरविलें. दोघांची तयारी होतांच शेटजी सह दिनकर ' मदिना' नांवाच्या मेलबोटीनें विलायतेस निघून गेला. प्रकरण तेरावें. वामनरावांच्या बंगल्यांतल्या मुख्य दिवाणखान्यांत भिसेस कमळाबाई व मिस मालती या दोघी सचिंत बसलेल्या असून जवळच डॉ. निळकंठरा- वहि दुर्मुखून बसले होते. मालतीचा चेहरा विशेष दुःखी दिसत असून तिचे डोळेहि पाण्याने भरून आलेले दिसत होते. या तिघांत थोडा वेळ अगदीं निस्तब्ध अशा स्थितीत गेल्यावर कमळाबाई एक लांब उसासा टाकून ह्मणाल्या, " माले, त्यांना जाऊन एक महिना झाला. हा महि- न्याचा हिशोब पाहून माझ्या तर पोटांत धडकी भरली आहे. पुढे कसे चालणार तें परमेश्वराला माहीत. तुझें ठीक आहे, तूं उद्यां लग्न झालें म्हणजे नवऱ्याकडे जाऊन राहशील; पण माझ्या पोरांचा अजून विद्याभ्यास व्हावयाचा आहे. " असें ह्मणून कमळाबाई स्तब्ध राहिल्या. कमळाबाईनें मालतीपुढे ही जी प्रस्तावना केली, त्याचें उत्तर मिळण्यापूर्वी थोडीशी हकीकत वाचकांना कळविली पाहिजे. दिनकर विलायतेस निघून गेल्यावर सहा महिन्यांनी वामनराव अजारी पडले आणि वरील डॉ० निळकंठराव यांची औषध योजना झाल्यावर दहाबारा दिवसांच्या अवधींत वामनरावांनीं इहलोकचा निरोप घेतला. वामनरावांच्या पश्चात मालतीचा कांटा कमळाबाईला सु०शो०... ११
पान:सुखाचा शोध.pdf/१६९
Appearance