१६८ सुखाचा शांध. माझ्यापासून तुम्हांला सुख मिळाले नाहीं, म्हणून तुम्हीं विलायतेस जात आहां, यामुळे फार वाईट वाटतें. आतांच आपण माझा एवढा तिरस्कार करतां. विलायतेहून आल्यावर तर मी अधिक तिरस्काराला पात्र होईन. " लक्ष्मीचे हे शब्द ऐकून दिनकरचें चित्त साहजिक थरारलें. सात कुलुपात ठेवलेल्या रहस्याचा भेद झाल्याप्रमाणे त्याला वाटून त्याचा चेहराहि किंचित् उद्विग्न झाला. तो म्हणाला, " तुम्हां सगळ्यांच्याच डोक्यांत हैं काय वेड शिरले आहे, कोणास माहीत ! मी त्या मालतीसाठी विलायतेस जात आहे, ही अगदीं खोटी गोष्ट. तिच्याबरोबर विवाह करण्याची माझी इच्छा नाहीं आणि इच्छा असली, तरी तिचा माझा विवाह होणें शक्य नाहीं. " लक्ष्मी हळूच म्हणाली, " कां ? ” “ तिचे वडील सुधारक असून फार समंजस गृहस्थ आहेत. एक बायको जिवंत असतां दुसरी करण्याची सुधारक परवानगी देत नाहींत. तेव्हां मालतीचा आणि माझा विवाह होणे शक्य आहे कीं अशक्य आहे, याचा तूंच विचार करून पहा. दिनकरच्या या भाषणानें लक्ष्मी कांहींशी प्रसन्न झाल्यासारखी दिसली. ती थोडा वेळ काहींच बोलली नाहीं, नंतर म्हणाली, ( तर विलायतेस जाण्याला मी तुम्हांला आनंदानें निरोप देते. तुमच्या सुखाचा एक मार्ग माझ्या हाती आहे, हें मटा आज समजलें, परमेश्वर करो आणि त्या मालतीच्या सहवासानें तरी तुम्हाला सुख मिळो ! " लक्ष्मीचे हे शब्द ऐकून दिनकरच्या हृदयावर विलक्षण आघात झाला. लक्ष्मीची योग्य शब्दांनी समजूत घालावी असे त्याला फार वाटूं लागलें; परंतु काय बोलावें हैं त्याला सुचेना. या वेळी पांडित्याची आवश्यकता नव्हती, तर अंतःकरणांतल्या खन्या प्रेमाच्या चारच शब्दाची आवश्यकता होती. दिनकरने आपले हृदयकपाट पुष्कळ धुंडाळले; पण त्याला ते चार शब्द कांहीं सापडले नाहींत. बराच वेळ तो मौन स्वीकारून वसला होता. नंतर त्यानें उद्वेगाचा एक उसासा टाकला आणि आंथरुणावर तो स्वस्थ पडून राहिला. लक्ष्मीहि यानंतर कांहीं बोलली नाहीं. तीहि निजली या
पान:सुखाचा शोध.pdf/१६८
Appearance