प्रकरण बारावे. १५९ दिवसांत तुमचें दर्शन नाहीं. एवढी अवकृपा कां ? राष्ट्रदीप मासिक- पुस्तकांत माझ्या कविता प्रसिद्ध झाल्यापासून मला कवयित्रीचा मान मिळाला आहे आणि आतां दुसरे संपादक कविता लिहून पाठवाव्या ह्मणून माझी विनवणी करूं लागले आहेत. त्या कवितेतल्या सगळ्या कल्पना दिनकररावांकडून उसन्या घेतल्या आहेत, हें जर त्यांना समजले तर - पण जाऊं द्या, मी त्या वाव तीत मौनच धरले आहे. आपले बंधु दिवाकरपंत मुलांना फार चांगले शिकवितात; पण त्या व्यतिरिक्त ते येथे क्षणभरहि थांबत नाहीत. माझ्याशों तर ते एक शब्दहि बोलत नाहींत. तुमच्या बोलण्यांत जी मधुरता, जै स्वारस्य आणि जिवाला चटका लागण्याची जी खुबी आहे, ती त्यांच्या बोलण्यांत नाहीं. तुमच्या याच गुणामुळे मला अगदी चुकल्या चुकल्यासारखे होतें. सवडीत सवड करून एकदां था. तुमच्याशी मला पुष्कळ बोलावयाचें आहे. अधिको त्तरावद्दल क्षमा असावी, ही विनंति. मालती. पत्रांतला हा गोड-अगदीं गोड-मजकूर वाचून दिनकरची वृत्ति पुन्हां बावरल्यासारखी झाली. यापुढे कशा रीतीने वागावें याचा विचार न करतां हा वेळपर्यंत मालतीशीं अढी धरल्याबद्दल त्याला अनुताप बाहूं लागला. मुकुंदशी तिचें जें वर्तन दिसून आलें, त्याचा आपण अगदींच निराळा अर्थ केला होता; पण त्यांत तिचा बिलकुल वाईट हेतु नव्हता, अशी आतां दिनकरची समजूत झाली आणि तो पुन्हां मालतीच्या भेटीला गेला. त्या वेळी व्यारिस्टर मुकुंद कांही कामासाठी बाहेर गांवी गेल्यामुळे त्या सात आठ दिवसांत मालतीच्या आणि दिनकरच्या पुन्हां पूर्वीसारख्या येथेच्छ गप्पागोष्टी झाल्या. मालतीच्या आग्रहावरून एकदां तो तिच्या बरोबर नाटकालाहि गेला. तसेच परभारें शेटजींच्या मोटारींतून मालतीला चार दोन वेळां हिंडावयास नेण्यासहि दिनकरनें कमी केले नाहीं. हळू हळू दिनकरच्या मनांतले सगळे किल्मिय निघून जाऊन त्यानें मालतीला पुन्हां हृदयासंहासनावर जागा दिली. परंतु त्यानंतर लवकरच मुकुंदची स्वारी
पान:सुखाचा शोध.pdf/१५९
Appearance