पान:सुखाचा शोध.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६० सुखाचा शोध. आली आणि पूर्वीप्रमाणे आतांहि मालतीचें दिनकरकडे दुर्लक्ष होऊं लागलं. मालतीचा आणि मुकुंदचा विनोद पूर्वीप्रमाणे सुरू झाल्यावर दिनकरचें मन पुन्हां अस्वस्थ झाले आणि त्यानें मालतीकडे जाण्याचे बंद केले. दिनकरचा हा निश्चयहि फारच थोडे दिवस टिकला. पूर्वीप्रमाणें मालतीचें गोड मजकुराचें पत्र येतांच सर्व विसरून जाऊन दिनकर पुन्हां मालतीच्या घरी जाऊन दाखल झाला. अशा रीतीने दिनकरनें चार पांच वेळां आशा निराशेच्या थपडा खाल्ल्यावर त्यानें योग्य बोध घेऊन सावध- गिरीनें बागावयास पाहिजे होते; परंतु तसे न होतां त्याची मनस्थिति अधिक च घोटाळ्याची झाली. मुकुंदविपर्थी त्याच्या मनांत विलक्षण मत्सर उत्पन्न झाला, आणि मालतीविषयी त्याच्या मनांत एक प्रकारची सहानु- भूति उत्पन्न झाली. मुकुंद वाईट मनुष्य असून मालतीला तो फसवीत आहे, तेव्हां त्याच्यापासून मालतीचे संरक्षण केले पाहिजे, असा निराळाच विचार दिनकरच्या मनांत उत्पन्न झाला. या विचाराने पुढे संकल्पाचें स्वरूप धारण केले आणि त्यामुळेच दिनकरच्या सगळ्या आयुष्याचा रंग पालटला. आतां मुकुंदच्या पुर्वतिहासाकडे दिनकरचें लक्ष गेलें. मुकुंदचें सगळें चरित्र मिळवावयाचें आणि तें मालतीपुढे ठेवून तिच्या मनातील मुकुंद विषयींचा आदर नाहींसा करावयाचा, असा वेत योजन दिनकर त्या उद्यो- गाला लागला. हळू हळू मुकुंदची वरीच माहिती दिनकरला मिळाली आणि त्यावरून मुकुंद हा एक छाकटा तरुण आहे. अशी त्याची खात्री झाली. आतां तर मालतीच्या संरक्षणाचा भार जणूं ईश्वरानेच आपणावर सौंपविला, असे दिनकरला वाटू लागले. यानंतर मुकुंदविपयों माहिती गोळा करीत असतां दिनकरला एक अगदींच चमत्कारिक हकीकत समजली. इंग्लंडांत असतां एका हलकट युरोपियन मुलीबरोबर मुकुंदनें सलगीनें वागण्याचा प्रयत्न केला. पुढे त्या मुलीने कायद्याची मदत घेऊन मुकुंदला विवाहित पति ह्मणून ठरविले आणि आपली स्वतःची अन्नवस्त्राची व्यवस्था तिनें लावून घेतली. या संबंधांत मुकुंदच्या वडील भावानें सुमारें पंधरावीस हजार रुपये खर्चून मुकुंदची कशीबशी सुटका करून